नवी दिल्ली – डिजिटल पेमेंट अँप्लिकेशन पेटीएमच्या नेक्स्ट जनरेशन क्रेडिट कार्डची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी विविध क्रेडिट कार्ड जारी करणार्या कंपन्यांशी पेटीएम करार करत असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील १२ ते १८ महिन्यांत जवळपास २० लाख क्रेडिट कार्ड देण्याची योजना असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. वापरकर्त्यांच्या कार्डवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कार्डधारकांना दैनंदिन व्यवहारात त्याचा वापर करता येणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच कार्ड धारकांसाठी क्रेडिट कार्ड अंतर्गत निरनिराळ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. सिक्युरिटी पिन क्रमांक बदलणे, डुप्लिकेट कार्डला मान्यता करणे, थकित क्रेडिट मर्यादा राबवणे अशा निरनिराळ्या सुविधा समाविष्ट करण्यात येणार आहे. ग्राहकांना बँकेत जावे लागणार नाही, यासाठी कंपनी काम करत आहे. सर्व क्रेडिट कार्ड सेवा पेटीएम अॅपवर उपलब्ध असणार आहेत. तसेच क्रेडिट कार्डच्या सुविधांमध्ये कॉन्टॅक्टलेस पेमेंट आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच, फसव्या व्यवहारासाठी कंपनीतर्फे विमा संरक्षण दिले जाणार आहे.
—
आकर्षक कॅशबॅकची सुविधा
पेटीएम क्रेडिट कार्डाच्या प्रत्येक व्यवहारावर खात्रीशीर कॅशबॅक मिळणार आहे. वापरकर्त्यांना कधीही या सुविधेचा वापर करता येणार आहे. कॅशबॅक व्हाउचरच्या रूपात असणार आहे. यात प्रवास, करमणूक आणि इतर बर्याच श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.