नवी दिल्ली – कोट्यवधी वापरकर्ते असलेले पेटीएम हे अॅप अखेर पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. गुगलच्या धोरणांचे उल्लंघन पेटीएमकडून झाल्याचे कारण देत हे अॅप प्ले स्टोअरवरुन हटविण्यात आले होते. लवकरच होणाऱ्या आयपीएल या स्पर्धेसंदर्भात पेटीएमने सट्टेबाजी सुरू केल्याचा आरोप आहे. कुठल्याही प्रकारच्या क्रीडा सट्टेबाजीला आम्ही प्रोत्साहन देत नाही. तशा अॅप्सला आम्ही परवानगी देणार नाही, असे सांगत गुगलने प्लेस्टोअरवरुन पेटीएम हटविले होते. अखेर हे अॅप सायंकाळच्या सुमारास प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले.
पेटीएम कंपनीने केलेले ट्वीट असे,