नवी दिल्ली – विमानप्रवाशांसाठी खुषखबर आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला देशातील विमानसेवा पूर्ववत केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केली आहे, दिवाळी आधी दोन तीन महिन्यात २.२५ लाख प्रवाशांना सेवा दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आता पर्यंत ७० टक्के क्षमतेने विमानसेवा सुरू आहे. ३१ डिसेंबर किंवा त्या नंतर ही सेवा पूर्णपणे सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सज्ज असावे असे ते म्हणाले. इंडियन स्कुल ऑफ बीझनेसद्वारा आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यात वार्षिक विमान खर्च सात अरब डॉलर असून यात १७ टक्के हातभार भारताचा असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील विमान सेवा अयशस्वी ठरण्यामागे कोणतेही ठोस कारण सध्या दिसत नसल्याचे ते म्हणाले. येत्या काही वर्षात विमान प्रवासात वाढ होणार असून, देशातील विमान उड्डाणाची संख्या २००० पार करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.