गोवा – अश्लिल व्हिडीओ प्रकरणी अटक करण्यात आलेली मॉडेल पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे या दोघांची काणकोण न्यायालयाने प्रत्येकी २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर मुक्तता केली आहे. मात्र, पुढचे काही दिवस त्यांना काण कोण पोलीस चौकीत हजेरी लावायची असून न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना गोवा सोडून जाता येणार नाही.
गेले काही दिवस पूनम पांडे पती सॅमसह गोव्यातच होती. तेथेच हा अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आला. यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला विंगने यासंबंधात तक्रार केली होती.
गोव्यातील चापोली डॅम येथे हा अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आला असून याप्रकरणी दोन पोलिसांना देखील निलंबित करण्यात आले आहे. अश्लील व्हिडीओ शूट करणे आणि सरकारी मालमत्तेत घुसखोरी करणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. पूनम पांडेच्या विवाहानंतर ती सातत्याने चर्चेत आहे. फिरायला गेल्यानंतर पती सॅमने आपल्याला मारहाण केल्याची तक्रारही तिने काही काळापूर्वी केली होती.