गोवा –अश्लील व्हीडीओ शूट प्रकरणी पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांच्यावरील कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच आता बॉलिवूड अभिनेता आणि प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण याच्याविरोधातही गोव्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढदिवसाच्या दिवशी (४ नोव्हेंबर) गोव्यातील समुद्रकिनारी विवस्त्रावस्थेत धावून त्याचा फोटो मिलिंद सोमण याने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यावर टीकेची झोड उठली होती. याप्रकरणी सोमण याच्याविरोधात भादंवि कलम २९४ आणि आयटी कायद्याच्या कलाम ६७ अंतर्गत तक्रार करण्यात आली आहे.