नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या द प्रेसिडेन्शियल मेमर्स या आगामी पुस्तकामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो. कारण प्रणवदा यांच्या मुलांमध्ये याबाबत असंतोष दिसत आहे.
विशेष म्हणजे, एकामागून एक ट्विट करून प्रणवदाचें पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रसार माध्यमात आलेल्या पुस्तकाच्या काही भागाविषयी चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, माझे वडील आज हयात नाहीत, म्हणून त्यांचा मुलगा म्हणून मला पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यातील माहिती बघायची आहे. कारण आज माझे वडील हयात असते तर त्यांनीही तसे केले असते. त्यांनी यासंबंधी प्रकाशकाला टॅग करत पुढे लिहिले की, त्यांचा (प्रणव मुखर्जी) मुलगा असल्याने माझी लेखी संमती न घेता हे प्रकाशन त्वरित थांबवावे, अशी मी विनंती करतो.
तर याउलट प्रवदाचीं कन्या शर्मिष्ठा यांनी ट्वीट करून आपला भाऊ अभिजीत यांना विनंती केली आहे की, वडिलांनी लिहिलेल्या शेवटच्या पुस्तकाच्या प्रकाशनात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये. आजारी पडण्यापूर्वी वडिलांनी हस्तलिखित पूर्ण केले होते, असे त्यांनी म्हटले आहे. अंतिम मसुद्यात प्रणवदांच्या हस्तलिखित नोट्स आणि टिप्पण्या आहेत.
त्यामुळे प्रसिद्धीसाठी कोणीही हे प्रकाशित होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करु नये. त्यांनी पुढे म्हटले आहे की, पुस्तकाचे नाव ‘द प्रेसिडेन्शियल मेमर्स’ आहे, ‘द प्रेसिडेन्शिअल इयर्स’ नव्हे.
काय आहे या पुस्तकात आता जाणून घेऊ या…
१) प्रणव मुखर्जी यांचे हे पुस्तक पुढच्या वर्षी जानेवारीत येणार आहे. प्रकाशनाच्या आधी या पुस्तकाबद्दल बरेच वादंग निर्माण झाले आहेत. या पुस्तकानुसार स्वत: प्रणव मुखर्जी यांनी लिहिले आहे की, ते राष्ट्रपती झाल्यानंतर कॉंग्रेसची दिशा गमावली आणि सोनिया गांधी या पक्षाची कामे सांभाळू शकल्या नाहीत.
२ ) या पुस्तकानुसार प्रणव मुखर्जी यांनी असेही लिहिले आहे की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी यूपीए आघाडीच्या संरक्षणासाठी अधिक काळ घालवला ज्याचा सरकारच्या कारभारावर वाईट परिणाम झाला. साहजिकच अशा परिस्थितीत प्रणव मुखर्जी यांचे हे पुस्तक कॉंग्रेसच्या अडचणी वाढवू शकते.
३ ) मुखर्जींनी त्यांच्या मृत्यूआधी ‘द प्रेसिडेन्शिअल इयर्स’ हे संस्कार लिहिले होते. रुपा पब्लिकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक जानेवारी २०२१ मध्ये वाचकांसाठी उपलब्ध होणार होते.