नाशिक – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाली. अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे होते. या बैठकीत ग्रंथप्रदर्शनामध्ये ग्रंथविक्रेते व प्रकाशक यांनी उपस्थित केलेल्या जीएसटी आकारणीबाबतही साकल्याने चर्चा झाली. या संदर्भातील त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन जीएसटीसह रुपये ६५०० शुल्क घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळे या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. ज्यांनी वेगळा जीएसटी भरला असेल तो परत करण्याची व्यवस्था करावी असे ठरले. प्रकाशन कट्ट्यावर ज्यांना आपल्या पुस्तकाचे, ग्रंथाचे प्रकाशन करायचे असेल त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही यावर शिक्का मोर्तब करण्यात आले.
ग्रंथप्रदर्शन समितीचे सदस्य तसेच लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी यांच्या समवेत झालेली ही बैठक एकूण कामाला दिशादर्शक अशी झाली. सुरुवातीला लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. शेवटी महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी आभार मानले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, सदस्य श्रीमती सुनीताराजे पवार, कुंडलिक अतकरे, ग्रंथप्रदर्शन समितीचे प्रमुख वसंत खैरनार आणि उपप्रमुख पंकज क्षेमकल्याणी तसेच साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह भगवान हिरे, सुभाष कार्यवाह, सहकार्यवाह किरण समेळ, कोषाध्यक्ष चंद्रकांत दीक्षित यांनी भाग घेतला होता.
दोन्ही उपक्रम विशेष महत्वाचे असणार
ग्रंथप्रदर्शन आणि नव्या पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रकाशन हे दोन महत्वाचे पैलू आणि साहित्य प्रसार कार्यास अतिशय पूरक असे उपक्रम असतात. याचा सर्व बाजूंनी विचार करून अधिकाधिक ग्रंथविक्रेते, प्रकाशन संस्था आणि नवोदित साहित्यिकांच्या पुस्तकांची मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन व्यवस्था ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केलेली आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी नेहमीच अशा कार्याला आपला पाठिंबा आणि आशीर्वाद दिलेले होते. म्हणूनच कुसुमाग्रज नगरीमध्ये होणारे हे दोन्ही उपक्रम विशेष महत्वाचे असणार आहेत. अशी चर्चा