नाशिक – कॅन्सरसारख्या दुर्धर आजारात शरीरावर आघात होतात. त्यातही रुग्ण निर्धाराने सहन करून त्यातून बाहेर येतो व नव्या आयुष्याला सामोरा जातो. तीच मनाची ऊर्जा येण्यासाठी पुस्तकांसारखा मित्र नाही व ती मैत्री चिरंतन असते. जणू मनावर शब्दांच्या माध्यमातून हळूवार फूल फिरण्याचा अनुभव आहे असे प्रतिपादन कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे शिल्पकार विनायक रानडे यांनी केले.
दत्त जयंती च्या सुमुहूर्तावर नामको कॅन्सर हॉस्पिटल, नाशिक येथील वैद्यकीय सेवा देणार्या तसेच रुग्णांना वाचनासाठी कै. मधूकाका बापट यांच्या स्मरणार्थ त्याच्या मित्र परिवाराने पुरस्कृत केलेल्या ग्रंथ पेटीचे वितरण कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी योजने अंतर्गत करण्यात आले याप्रसंगी ग्रंथ तुमच्या दारी चे प्रणेते विनायक रानडे, ग्रंथ पेटीचे प्रायोजक-देवेंद्र बापट, विनायक गोखले, सुदीप नेने, प्रभंजन पटवर्धन तसेच नामको हॉस्पिटलचे डॉ. महेश पडवळ, डॉ. लक्ष्मीकांत पाठक, डॉ. प्रशांत टर्ले, एस. व्ही. भालेराव, वैदेही शिंदिकर हे उपस्थित होते.
रानडे पुढे म्हणाले की, कै. मधुकरकाका बापट यांनी नाशिकच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. गरजूंना त्यांना भरीव मदत व सहकार्य केले. त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून ग्रंथपेटी प्रदान करण्यात येत आहे.
ग्रंथ तुमच्या दारी मराठी वाचक जेथे, ग्रंथ तुमच्या दारी तेथे. ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड सुरू आहे. २ कोटी २५ लाख रुपयांची ग्रंथ संपदा महाराष्ट्र, गोवा, गुजराथ, दिल्ली, सिल्व्हास, तामिळनाडू, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झरलॅन्ड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, मॉरिशस, ओमान, मस्कत, सॅनफ्रान्सिस्को, बे एरिया, सिंगापूर, लंडन, श्रीलंका आदि ठिकाणी पोहोचली असून तिथे वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.