नाशिक – मालेगाव येथे पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पदाधिका-यांनी कृषी तथा सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, यांची भेट घेतली. यावेळी माजी सैनिकांच्या पुर्ननियुक्त सेवेतील अडी-अडचणींबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी भुसे यांना लेखी निवेदन देखील देण्यात आले. त्यात ५, १० व १५ वर्षात आश्वासित प्रगती योजना सर्व पुनर्नियुक्त माजी सैनिकांना लागू करणे, सर्व पुनर्नियुक्त माजी सैनिकांसाठी नवीन बदली धोरण बनविणे, कृषी सहायकांची नियुक्ती मानधनावर न करता कायम करणे, शासनाच्या सर्व विभागात पुर्ननियुक्त झाल्यानंतर त्या त्या विभागात सन्मानाची वागणूक मिळणे.
यावेळी दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या भेटीत शासन पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष सुनील पवार, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, सचिव ज्ञानेश्वर पगार, जिल्हा संघटक संजय बोरसे व राज्य कोषाध्यक्ष दिपक पाटील हे उपस्थित होते