पुरुषांमधील अयोग्य स्तनवाढ ठरू शकते न्यूनगंडाचे कारण
Gynaecomastia म्हणजे पुरुषाच्या स्तनाची प्रमाणाबाहेर मेदयुक्त वाढ होणे. हॉर्मोन्सचा असमतोल झाल्याने हि वाढ होते . या असमतोलाचा प्रभाव एका किंवा दोघे बाजूला जाणवतो. दोन्ही बाजूला असल्यास कधी कधी त्यांमध्ये असमानता पण असू शकते. ५० टक्के पुरुषांमध्ये हि समस्या आढळून येते. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
खूप साऱ्या पुरुषांना ही समस्या कशी आणि कुणाजवळ व्यक्त करावी, सांगितले तर कुणी आपल्यावर हसणार तर नाही ना.. अशा भावना असतात. नवजात मुले, पौगंडावस्थेतुन जाणारी मुले , आणि वयोवृद्ध माणसे या वयोगटात gynecomastia विकसित होऊ शकतो.
होण्याचे कारण काय?
संप्रेरकांचा असमतोल ( Hormonal Imbalance) हा अनेक कारणांमुळे होऊ शकतो. त्याला अनुवंशिकता , काही औषधे , शरीरसौष्ठ वाढविण्यासाठी स्टेरॉइड्स वापरणे, शरीरावर इतरत्र वाढलेली चरबी (Generalised fat deposition) , विशिष्ठ वायरल इन्फेक्शन्स आणि इतर बरिच कारणे जबाबदार असू शकतात.
कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागते?
गायनेकोमॅस्टिया जरी एक गंभीर आजार नसला तरीही तरुण मुलांमध्ये तो त्रासदायक वाटू शकतो.
अयोग्य स्तनवाढीमुळे मित्र मंडळींकडून सारखं चिडविले जाणं, त्यांचं छातीला हात लावणं असे हि प्रकार घडतात.
पळतांना, सायकल किंवा बाईक चालवतांना, स्तनांची जास्त हालचाल होते.
पोहतांना, जिम मध्ये व्यायाम करतांना, एवढंच काय तर स्वतःच्या घरात सुद्धा शर्ट काढून वावरतांना अशा मुलांना लाजिरवाणे वाटते. अश्या गोष्टींमुळे ही मुले बऱ्याच मैदानी खेळांना नापसंती दर्शवतात.
इतर समवयीन मुलांसारखे ट्रेंडी आणि टाईट फिटिंग शर्ट्स किंवा टी शर्ट्स घातले तर छातीचा वाढीव आकार स्पष्ट दिसुन येतो त्यामुळे नाईलाजाने अशी मुले ढगळ कपडे घालतात जेणेकरून छातीचा वाढीव आकार त्यामुळे काही अंशी लपला जातो.
छातीचा वाढीव आकार लपवण्यासाठी अशी मुले खांदे पुढे काढून आणि मान थोडी वाकवून चालतात, ह्याला शोल्डर स्लॉऊचिंग असं म्हटलं जातं. ह्यामुळे कालांतराने आपलं पोश्चर म्हणजेच उभं राहण्याची आणि चालण्याची पद्धत कि कायमस्वरूपी बदलते.
ह्या सगळ्या गोष्टींमुळे साहजिकच मुलांमध्ये एकटेपणाच प्रमाण वाढत त्याचबरोबर , कुठलाही स्पष्ट आजार नसल्या कारणाने कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींकडून ह्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते यामुळे त्यांना नैराश्य आणि न्यूनगंडाला सामोरं जावं लागत.
गायनेकोमॅस्टिया टाईप्स :
Grade I: Small enlargement without skin excess
Grade II : Moderate enlargement without skin excess
Grade III : Moderate enlargement with minor skin excess
Grade IV : Marked enlargement with excess skin, mimicking female breast.
Uncommon types:
- Marked fat deposition with very little glandular tissue ( लायपोमॅस्टीया / सिडो Gynecomastia)
- Unilateral Gynecomastia
- Puffy Nipples: ह्यामध्ये स्तनाग्रांच्या पाठीमागेच जास्त फुगीरपणा असतो. आणि आजूबाजूला इतर समवयीन मुलांप्रमाणेच चरबी असते.
- Gynecomastia in body builders.बॉडी बिल्डर्स मध्ये हि बऱ्याच प्रमाणात गायनेकोमॅस्टिया आढळून येतो. त्यांच्यामध्ये बाकीची छाती अगदी पुरुषी आणि भारदस्त असते परंतु छातीचा खालचा भाग गोलाकार असण्या ऐवजी कोनिकल असतो. ऑपरेशन नंतर ह्या मुलांच्या छातीच्या आकारात लाक्षणिक पॉजिटीव्ह बदल दिसून येतात.
यामध्ये चरबी आणि ग्रंथी वेगवेगळ्या प्रमाणात प्रत्येकांमध्ये असते. ग्रेड कुठलाही असो , बहुतांशी सगळ्या गायनेकोमॅस्टिया पेशंट्समध्ये लायपोसक्शन करून चरबी कमी करणं किंवा दोघे बाजूंचा समतोल साधन आणि मग उरलेली ग्रंथी काढून घेणं ह्या गोष्टी आवश्यक असतात.
काय उपचार पद्धती उपलब्ध आहे?
वयोमानानुसार झालेली स्तनवाढ ही बहुतांशी आपोआप ओसरते. समतोल आहार, व्यायाम, आणि औषधे (कुठल्या आजारामुळे ही अवस्था झाल्यास) छातीमध्ये झालेली ही वाढ काही अंशी कमी होऊ शकते. तसे न झाल्यास ऑपरेशन द्वारे त्याला कमी करता येते.
कुठलाही विशिष्ठ व्यायाम केल्याने अथवा आहार ( Diet ) पाळल्याने किंवा कुठलीही औषधे घेतल्याने / मसाज केल्याने हि वाढ आपोआप नाहीशी होत नाही!
ऑपरेशन आणि त्यानंतरची काळजी ह्याबद्दल जरा सांगाल का?
छातीत गाठ जाणवणे, ती सतत किंवा हात लावल्यावर दुखणे, यांपैकी काहीही जाणवल्यास डॉक्टरांना त्वरित दाखविणे गरजेचे आहे. साधारणतः पूर्वीच्या काळी ह्याचे ऑपरेशन हे छातीवर मोठा छेद (Incision) करून केले जात असे, त्यामुळे तिथे मोठा व्रण तयार होतो. अत्याधुनिक अश्या लायपोसक्शन पद्धतीने आता हे करणे अधिक सोपे झाले आहे. यामध्ये शरीराला पूर्ण भूल दिल्यानंतर सूक्ष्म अश्या छिद्रामधून स्तनाच्या अवतीभोवती असलेली चरबी शोषून घेतली जाते. यानंतरही जो भाग कमी झाला नाही (Glandular Portion) तो पण आवश्यकता जाणवल्यास एका छोट्या छिद्रातून बाहेर काढला जातो.
या ऑपरेशन पद्धतीमध्ये कमीत कमी व्रण छातीवर राहील याची काळजी प्लास्टिक सर्जन घेतात.
हे ऑपरेशन डे केअर सर्जरी (हॉस्पिटल मध्ये राहण्याची गरज नाही ) म्हणून पण केले जाऊ शकते. चरबी काढून घेतलेल्या जागी पाणी किंवा रक्त जमा होऊ नये आणि तिथली सूज कमी व्हावी यासाठी ऑपरेशन नंतर लगेचच कम्प्रेशन ड्रेसिंग दिले जाते. २ ते ३ दिवसानंतर ते बदलून कम्प्रेशन गारमेंट दिले जाते. ह्यामुळे वर नमूद केलेल्या फायद्यांव्यतिरिक्त, छातीच्या भागाला आधार मिळून दुखणे कमी होते आणि ऑपरेशन पासून शरीराला मिळालेला आकार टिकून राहतो आणि त्याचबरोबर वाढलेली कातडी मागे ओसरण्यासहि (Skin Redraping) मदत होते. कम्प्रेशन गारमेंट कमीत कमी ६ महिन्यांच्या कालावधीसाठी वापरणे आवश्यक आहे. ऑपरेशन नंतर ४ ते ५ दिवस हलके दुखणे जाणवू शकते जे वेदनाशामक औषधे (Analgesics) घेऊन कमी होते. ५ ते ६ दिवसानंतर दैनंदिन कामाला सुरुवात केली जाऊ शकते आणि १ महिन्यानंतर जड वजनांचा व्यायाम चालू करू शकतो.