मॉस्को – रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या मनमानी कारभारा विरोधात रशियन नागरिक लाखोच्या संख्येने एकत्र येत आहेत. रशियातील १०० पेक्षा अधिक शहरांमध्ये हजारो नागरिक निदर्शने करीत असल्याने ही बाब जगभरात चर्चेची ठरली आहे. विरोधी पक्षनेते एलेक्सी नवलेनी यांना पुतिन सरकारने अटक केली आहे. त्याविरोधात जनतेचा हा असंतोष उफाळून आला आहे.
पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच ३ हजाराहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. नवलेनी यांची अटक म्हणजे विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असे आंदोलक ठासून सांगत आहेत. विशेष म्हणजे, उणे ५४ अंश सेल्सिअस एवढ्या कडाक्याच्या थंडीतही नागरिक रस्त्यावर येऊन निदर्शने करीत आहेत. या आंदोलनाचे फोटो जगभर व्हायरल होत असून पुतिन यांच्या कारभारावर टीका केली जात आहे. काही ठिकाणी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. तरीही नागरिक मागे हटण्यास तयार नाहीत. युवक, युवतींपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच आंदोलनात सहभागी होत आहेत.
बघा तेथील आंदोलनाचे फोटो