चांदवड – बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जाणीवपूर्वक व राजकीय सूडबुद्धीने रातोरात हटवण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना चांदवड तालुका व शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत तहसीलदार प्रकाश पाटील यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक सरकारने संबंधितांवर कडक कारवाई करून तातडीने राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची सन्मानपुर्वक पुनर्स्थापना करावी अन्यथा उग्र आंदोलन यापुढे केले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
तालुका अध्यक्ष शांतराम ठाकरे, नगरसेवक जगन राऊत, शहराध्यक्ष संदीप उगले, दीपक शिरसाठ, समाधान जाधव, संपतराव जाधव, गोरख हिरे, माणिक ठाकरे, माणिक सवंद्रे, प्रवीण राजगिरे, बाळासाहेब गांगुर्डे, सिद्धांत साबळे, जालिंधर दिवटे, अंबादास जाधव, चंद्रकांत देवरे, ज्ञानेश्वर ठाकरे, रोहित ठाकरे, दीपक भोयटे, योगेश गुंजाळ, मिनाताई शिरसाठ आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.