रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुण्यात ओबीसी मोर्चा दरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक

डिसेंबर 3, 2020 | 7:28 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20201203 WA0003

पुणे – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नसून पूर्णपणे पाठिंबा आहे. मात्र मराठा आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज पुणे शहरात झालेल्या मोर्चा दरम्यान स्पष्ट केली. आंदोलनादरम्यान समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवाना बळाचा वापर करून पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना फरास खाना विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. त्यानंतर काही वेळानंतर त्यांची पोलिसांनी सुटका केली.

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचावासंदर्भात विविध मागण्यांसाठी पुणे शहरात शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचे नियोजन होते. यावेळी शनिवार वाडा येथून मोर्चा पुढे जाण्यासाठी निघाला असतांना ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. यावेळी पोलिसांकडून मज्जाव केल्याने समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांनी यांनी शनिवारी वाडा परिसरातील रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी उठ ओबीसी जागा हो समतेचा धागा हो, जय समता जय संविधान, बोल ओबीसी हल्लाबोल अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी समीर भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षण बचावासाठी विविध मागण्यांसाठी आज पुणे येथे मोर्चा काढण्याबाबत पोलिसांना कल्पना दिली होती. मात्र ऐनवेळी मोर्चा सुरू झाल्यानंतर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. ओबीसी बांधावामध्ये जनजागृती करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येऊन आंदोलन करत असतांना दडपशाहीतून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याची असल्याची टीका त्यांनी केली.
समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, आमदार दिप्ती चवधरी,माजी आमदार कमलताई ढोले पाटील,  राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष  रुपाली चाकणकर, योगेश ससाणे, संदिप लडकत, महिला प्रदेशाध्यक्ष  मंजिरी धाडगे, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, बाळासाहेब कर्डक,  दिलीप खैरे, पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे, कविता कर्डक, संतोष डोमे, सुनिता शेलवंटे, पोपट कुंभार,गजानान पंडित, मोहन देशमाने, लक्ष्मण हाके, नंदकुमार गोसावी, दया इरकल, अजय मुंढ, माधुरी देव, प्रताप गुरव, सोमनाथ काशिद, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, अॅड.प्रतीक कर्डक, विजय जाधव, समाधान जेजुरकर, हर्षल खैरनार यांच्यासह समता सैनिक उपस्थित होते.
पोलीस स्टेशन मधून सुटका झाल्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी पोलिसांच्या परवानगीने निवडक आंदोलकांसह जिल्ह्याधिकारी कार्यालय पुणे येथे जाऊन जिल्हाधिकारी यांना ओबीसी बांधवांचे विविध मागण्यांचे निवेदन दिले.
याबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अखिल महात्मा फुले समता परिषदेच्या अथक प्रयत्नांमुळे मा. शरद पवार यांनी २३ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. देशपातळीवर केंद्रीय नोकर्यार व शिक्षणात २७ टक्के आरक्षण देणारा मंडल आयोग १३ ऑगष्ट १९९० रोजी लागू करण्यात आलेला होता. त्याला मा. सर्वोच्च न्यायालयाने १६ नोव्हेंबर १९९३ रोजी मान्यता दिलेली होती. पुढे २००६ साली उच्च शिक्षण संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. महाराष्ट्रासारख्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या राज्यात १९६७ साली शिक्षण व शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण दिले गेलेले होते. त्याची शिफारस त्यावेळच्या राज्य सरकारने नेमलेल्या बी.डी. देशमुख आयोगाने अभ्यासपुर्वक केलेली होती. त्या जातींच्या यादीमध्ये वेळोवेळी मुटाटकर समितीच्या व राज्य मागास वर्ग आयोगांच्या शिफारशींमुळे वाढ होत गेली. आज ह्या यादीत ( इ.मा.व, वि.मा.प्र, वि.जा.भ.ज. ) ४०० पेक्षा आधिक जातीजमातीचा समावेश असल्याचे म्हटले आहे.
राज्यात जरी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी असे तीन उपगट असले व व्हीजेएनटीचे आणखी चार उपगट असले तरी ह्या सर्व जातीजमाती केंद्रीय यादीत ओबीसी म्हणूनच ओळखल्या जातात. तसेच पंचायत राज्यातील राजकीय आरक्षणासाठी त्या सर्वांना ओबीसी म्हणूनच मान्यता आहे. केंद्रीय पातळीवरील शिक्षण व नोकर्यानत तसेच पंचायत राज्यातील राजकीय आरक्षणात या सर्वांना मिळून २७ टक्के जागा आरक्षित आहेत.  मात्र आपल्या राज्यात अनुसुचित जाती व जमातींचे आरक्षण २० टक्के असून ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी यांना अनुक्रमे १९ टक्के, ११ टक्के व २ टक्के असे मिळून ३२ टक्के आरक्षण दिले जातेय. तथापि मेडीकल व इंजिनियरिंगच्या जागांमध्ये एसबीसीचे २ टक्के हे ओबीसीतून दिले जात असल्याने ओबीसीला अंतत: फक्त १७ टक्के आरक्षण मिळते. आदीवासीबहुल अशा नंदुरबार, पालघर, गडचिरोली आदी जिल्ह्यांमध्ये तर ते अवघे ६ ते ९ टक्के दिले जाते असे म्हटले आहे.
या आरक्षणामुळे आजवर सुमारे ५ लाख व्यक्तींना राजकीय सत्तेची पदे ( ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगर परिषद, नगर पालिका, महानगर पालिका इत्यादीमध्ये ) मिळाली. लाखो विद्यार्थी एमपीएससी, युपीएससी परीक्षा पास होऊन राज्य व केंद्र सरकारच्या नोकर्यांपमध्ये विविध पदांवर काम करू लागले. लाखो विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, वकील, सीए झाले आहे. मात्र आज हे आरक्षण संपवण्याचा २ पातळ्यांवर घाट घातला जात आहे. एक- मुंबई व दिल्लीच्या न्यायालयात विविध अर्ज करून सर्व ओबीसींना बाहेर काढण्याचा कट व मराठा समाजाला ओबीसीत घालून ओबीसी आरक्षण पळवून नेण्याचा कट रचला जात असल्याचे म्हटले आहे.
त्यात पुढे म्हटले आहे की, ५/१} Bombay High Court – मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा नेते व न्या. गायकवाड आयोगाचे सर्वेक्षणाचे कंत्राट मिळवणार्या छत्रपती शिवाजी प्रबोधिनी या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सराटे यांनी 4/2019 ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. ती स्विकारली गेलेली आहे. लवकरच तिची सुनावणी होईल. सराटे यांनी राज्यातील सर्वच्या सर्व ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जातीजमातींचे आरक्षण बंद करण्याची मागणी केलेली आहे. याचा अर्थ १९५० पासून अस्तित्वात असलेले व्हीजेएनटी आरक्षण, १९६७ पासून मिळणारे ओबीसी आरक्षण व १९९०च्या दशकात सुरू झालेले एसबीसी न्यायालयाच्या मार्गाने रद्द करण्याचा कट आखण्यात आलेला आहे. त्यासाठी दिलेली कारणे निराधार, कपोलकल्पित आणि ओबीसी द्वेशावर आधारलेली आहेत. ह्या जातीजमातींचा कोणताही अभ्यास न करता त्यांना आरक्षण दिले गेलेले आहे हा सराटे यांचा आक्षेप बिनबुडाचा आहे. प्रत्यक्षात बी.डी. देशमुख आयोग, मंडल आयोग, मुटाटकर समिती, न्या. खत्री आयोग, न्या. बापट आयोग, न्या. सराफ आयोग, न्या. भाटीया आयोग यांनी सखोल अभ्यास करूनच या जातीजमातींना आरक्षण दिलेले आहे. ५/२} मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे असेच आमचे मत आहे. त्यासाठी ओबीसीच्या ताटातला घास पळवला जाऊ नये, ओबीसीच्या कोट्याला हात न लावता मराठा बांधवांना वेगळे आरक्षण जरूर द्यावे अशीच आमची मागणी आहे. न्या. म्हसे व न्या. गायकवाड आयोगांनी तशी शिफारस केली व त्यानुसार राज्य सरकारने कायदा केला असल्याचे म्हटले आहे.
तसेच ५/३} मराठा समाजाच्या आरक्षणाला मा. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे. अशा परिस्थितीत सराटे व इतर मराठा व्यक्ती/संस्थांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातच घालावे तसेच आत्ताच्या सर्व ओबीसी जातींना बाहेर काढावे अशा विपरित मागण्या सर्वोच्च न्यायालयात केलेल्या आहेत. त्या मागण्या मान्य झाल्यास दुबळ्या, मागासलेल्या, बलुतेदार, अलुतेदार असलेल्या ह्या सर्व कष्टकरी जातींवर न भुतो न भविष्यती अन्याय होणार आहे. ५/४} ओबीसी व मराठा बांधवांमध्ये असलेला सलोखा, एकोपा बिघडावा, त्यांच्यामध्ये वैर निर्माण व्हावे, राज्यातील राष्ट्रीय एकात्मता संपवावी, या दुष्ट हेतूने, सनातन्यांच्या, जातीयवाद्यांच्या, घटनाविरोधी शक्तींच्या चिथावणींवरून हे बाळासाहेब सराटे काम करीत आहेत. ५/५} फुले-शाहू-आंबेडकरांच्या प्रागतिक महाराष्ट्राच्या बदनामीसाठी काही विरोधी शक्ती कार्यरत आहेत. जातीजातीत कलागती लावून राज्यातील शांतता व कायदा आणि सुव्यवस्था नष्ट करण्यासाठी हे कारस्थान चालू आहे. त्याला शासनाने तात्काळ आळा घालयला हवा असे म्हटले आहे.
त्याचबरोबर राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात दुबळ्या ओबीसींची न्याय्य बाजू मांडण्यासाठी देशातील नामवंत वकीलांची फौज उभी करायला हवी. त्याचबरोबर प्रत्येक ओबीसी जातीने आपापले वकील देऊन हस्तक्षेप याचिका करायला हव्यात. आमची एकमुखी मागणी आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करू नये. तसे झाल्यास आधीच ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना अवघ्या १७ टक्के जागा दिल्या गेलेल्या आहेत आणि त्यातल्या बारा टक्केच भरलेल्या आहेत अशा अवस्थेत प्रबळ, सत्ताधारी व राज्यकर्त्या मराठ्यांना ओबीसीत घातल्यास त्यांनाही काही मिळणार नाही आणि मुळच्या ओबीसींचेही नुकसान होईल असे त्यांनी म्हटले आहे.
ओबीसी आरक्षण बचावासाठी काढण्यात आलेल्या मोर्चा मध्ये ओबीसी बांधब मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या हातात ओबीसी आरक्षण बचावाचे विविध फलक, मफलर, टोपी यासह झेंडे घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच आरक्षण बचावासाठी घोषणाबाजी देखील केली. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिस्तबद्ध स्वरूपात निघालेल्या मोर्चात कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बघा, ‘हर्ष कन्स्ट्रक्शन’चे चेअरमन विलास बिरारी यांची यशोगाथा (व्हिडिओ)

Next Post

अक्षर कविता – निलिमा श्रुतीश्रवण यांच्या ‘मंतरलेलं झाड’ या कवितेचे अक्षरचित्र

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20201203 WA0020

अक्षर कविता - निलिमा श्रुतीश्रवण यांच्या 'मंतरलेलं झाड' या कवितेचे अक्षरचित्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011