नाशिक – पुणे शहरात गवा शिरल्यानंतर नागरिकांच्या पाठलगामुळे पळून पळून तो थकला आणि अखेर त्याने आपले प्राण सोडले. या साऱ्या प्रकाराने जिल्हाधिकारी सूरज मांढरे खुपच व्यथित झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी एक संदेश प्रसारित केला आहे. तो असा,
मेळघाट मध्ये पोस्टिंग असताना गवे कित्तेक वेळेला हापशी चे पाणी प्यायला येत असत आणि गावातील लोक सहजगत्या त्यांच्या आजूबाजूला फिरत असत अगदी लहान मुलांसकट ..
आजचा पुण्यातील प्रकार पाहून आपण खूपच सुसंस्कृत होत चाललो आहोत याची जाणीव झाली..
सिम्बा बरोबर संध्याकाळी काही वेळ घालवून थोड प्राणीत्व रिचार्ज करून घेतलं तेव्हा मन हलकं झालं..
एखादा प्राणी चुकून ज्या वेळेला मानवी वस्तीत घुसतो त्या वेळेला माणसे जितकी प्राण्यासारखी वागतात तितका तो प्राणी सुद्धा हिस्त्र वागत नाही.
असा प्रसंग आपल्या जिल्ह्यामध्ये घडल्यास त्या क्षेत्रात तातडीने संचारबंदी जाहीर करून केवळ वनविभागाचे लोक, पोलिस आणि त्या क्षेत्रातील तज्ञ यांनाच तो प्राणी पकडण्याची मुभा दिली जाईल.
याबाबत सर्व नागरिकांचे आधीच प्रबोधन करणे सुद्धा गरजेचे आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक