पुणे – संपूर्ण देशात कोरोनाची कोविशिल्ड या लसीचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग लागली आहे. बीसीजी लस बनविण्यात येणाऱ्या इमारतीला आग लागली असून तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मांजरी या भागात हा प्लँट आहे. पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दहा गाड्या घटनास्थळी सध्या सेवा देत आहेत. आग लागलेल्या इमारतीत ४ जण अडकले होते. यातील तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून एकाचा शोध सुरू आहे. कोरोना लस कोविशिल्डचे उत्पादन करणारा प्रकल्प सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
https://twitter.com/adarpoonawalla/status/1352210515880255489
बघा आगीचा व्हिडिओ
https://twitter.com/ARanganathan72/status/1352189511132868612