नाशिक – देशातील सर्वात जुन्या तीन महाविद्यालयामध्ये ज्याचा उल्लेख होतो अशा सीओईपी अल्युमनी (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ,पुणे माजी विद्यार्थी संघटना) च्या नाशिक कट्टाची उद्घाटन २६ जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या महाविद्यालयाची १८५४ साली स्थापना झाली आहे.
नाशिक कट्टाचे उद्घाटन सोहळ्याला सीओईपी पुणे अल्यूमणी असोसिएशनचे पदाधिकारी तसेच नाशिक शहरातील सर्व माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सीओईपी माजी विद्यार्थी संघटना, नाशिक यांची यासंदर्भात पंधरा दिवसापूर्वी अशोका स्कूलला बैठक झाली होती. त्यात उपस्थित शंभर माजी विद्यार्थ्यांनी नाशिक कट्टा सुरू करण्याबाबत ठरविले होते. पुणे शहरानंतर नाशिक येथे हा दुसरा कट्टा सुरु होतो आहे. तसेच नाशिक कट्टाद्वारे विविध उपक्रम, गेट-टुगेदर , आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, स्टार्ट करता मदत ,नाशिक शहरात ५०० विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे कार्यक्रम देणे, संस्थे करता कॉर्पस उभा करणे यासारखे उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन मिटींगला उपस्थित राहावे असे आवाहन अशोक कटारिया, प्रशांत पाटील, विजय बाविस्कर ,अरविंद महापात्रा यांनी केले आहे.