रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुणे – सामर्थ्य सेवेचे या ई- बुकचे प्रकाशन

by India Darpan
सप्टेंबर 16, 2020 | 1:37 pm
in राज्य
0
IMG 20200916 WA0017

पुणे –  गरवारे महाविद्यालय येथे कोरोना रूग्णांसाठी सुरू असलेल्या कोविड उपचार केंद्रावर सेवा भावनेतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनुभव कथनावर आधारीत “सामर्थ्य सेवेचे” या ई- बुकचे  प्रकाशन प्रसिध्द उद्योजक सुधीर मेहता यांच्या हस्ते आणि समर्थ भारत पुनर्बांधणी योजनेचे संयोजक रवींद्र शिंगणापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल पध्दतीने संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्ते व  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीणजी दबडघाव म्हणाले की, सध्याच्या बिकट स्थितीतील प्रश्न केवळ प्रशासन सोडवू शकणार नाही, तर प्रशासनाच्या प्रयत्नाला समाजाची जोड मिळायला हवी. तरच आपण सध्याच्या संकटावर मात करू शकू, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीणजी दबडघाव यांनी व्यक्त केला.
यावेळी पुस्तक प्रकाशना मागची भूमिका सांगण्यात आली. गरवारे महाविद्यालय येथे जनकल्याण समिती, समर्थ भारत पुनर्बांधणी योजना, पुणे महानगर पालिका आणि पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स ( पीपीसीआर) या संस्थांच्या सहभागातून एक सर्व सुविधायुक्त असे कोविड आरोग्यसेवा केंद्र उभे करण्यात आले आहे. तेथे कोरोना रूग्णसेवा करत असलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, गरवारे महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय अधिकारी, कर्मचारी, केंद्राला अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था-संघटनांचे प्रतिनिधी आणि या कामात स्वतःला झोकून देऊन काम करणारे जनकल्याण समितीचे तरूण कार्यकर्ते या सर्वांनी कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या रूग्णांना आपल्या मनःपूर्वक सेवाभावाने जिंकले असून त्यामुळे शेकडो रूग्ण बरे होवून निश्चिंत मनाने घरी गेले आहेत. याच मौलीक अनुभवांचे मोल समाजासमोर येण्यासाठी व त्यातून एक आशादायक वातावरण निर्मिती होण्यासाठी भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्र यांनी “सामर्थ्य सेवेचे” या ई- बुकची निर्मिती केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अमृता खाकुर्डीकर यांनी केले व आभार देविदास देशपांडे यांनी मानले. याप्रसंगी भारतीय विचार साधनेचे  विवेक जोशी, मिडिया विद्या स्टुडिओचे संचालक अजिंक्य कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते  मनोज पोचट ई. यावेळी उपस्थित होते. सदर ‘सामर्थ्य सेवेचे’ हे ई-पुस्तक वाचकांसाठी भारतीय विचार साधनाच्या www.bhavisa.org या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

झेडपीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे उदघाटन

Next Post

डांगसौंदाणे येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Next Post
IMG 20200916 WA0047

डांगसौंदाणे येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011