पुणे – पुणे विभागातील 6 लाख 30 हजार 889 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 94 हजार 356 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 46 हजार 642 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 825 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.86 टक्के आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 73 हजार 799 रुग्णांपैकी 4 लाख 24 हजार 274 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 40 हजार 15 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 510 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.01 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.55 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 62 हजार 425 रुग्णांपैकी 58 हजार 256 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 289 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 880 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 938 रुग्णांपैकी 52 हजार 222 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 813 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 903 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 856 रुग्णांपैकी 47 हजार 78 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 3 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 338 रुग्णांपैकी 49 हजार 59 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 522 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 41 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 321, सातारा जिल्ह्यात 133, सोलापूर जिल्ह्यात 306, सांगली जिल्ह्यात 230 तर कोल्हापूर जिल्ह्यात 51 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 587 आहे. पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 308, सातारा जिल्हयामध्ये 67, सोलापूर जिल्हयामध्ये 151, सांगली जिल्हयामध्ये 19 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 42 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 45 लाख 71 हजार 590 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 94 हजार 356 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( 22 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )