पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल येत्या १२ नोव्हेंबरच्या आत लागणार आहे. विद्यापीठाच्या २ लाख ४७ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यात ऑनलाईन पद्धतीने १ लाख ८५ हजार (८५ टक्के) तर ३० हजार (१५ टक्के) विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा दिली. आतापर्यंत ३ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ८७ टक्के आहे. उर्वरीत सर्व परीक्षांचे निकाल येत्या १२ तारखेपर्यंत लागतील, अशी माहिती कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिली आहे.