पुणे – राज्यातील अतिवृष्टेच्या इशाऱ्याची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यासंबंधीची नोटिस विद्यापीठाने वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. तसेच, परीक्षांचे आगामी वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. अतिवृष्टीमुळे मोबाईल नेटवर्कमध्ये येऊ शकणाऱ्या अडचणी तसेच ऑफलाईन परीक्षेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी येणारे अडथळे लक्षात घेऊन विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील त्या त्या कॉलेजचे प्राचार्य परीक्षांसंदर्भातील अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विद्यापीठाची नोटिस अशी