नाशिक – सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १ ते २२ सप्टेंबर दरम्यान होणार असून प्रात्यक्षिक परीक्षा मंगळवारपासून सुरु होत आहेत. एमसीक्यू बेस परीक्षा होणार असून ऑनलाईन तसेच ऑफलाईन परीक्षा पद्धतीसाठी चाचपणी केली जात आहे. ऑनलाईन तसेच ऑफलाईन परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना त्या संबंधी ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे. हे अर्ज भरण्यासाठी रविवार १३ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंबंधी परिपत्रक सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ ऑक्टोबर पासून लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे. तसेच १५ सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरणे अनिवार्य असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन सोय केली जाणार आहे. त्याच अनुषंगाने पुणे विद्यापीठाकडून ऑप्शन फॉर्म मागवले असून त्यात परीक्षा देण्याची पद्धत निवडणे अत्यावश्यक आहे. प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यावर १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान बॅकलॉगचे पेपर होणार आहेत. तसेच अंतिम सत्राचे (चालू सत्र) पेपर ९ तारखेपासून घेतले जाणार आहेत. ५० गुणांची परीक्षा होणार असून यासाठी ५० प्रश्न विचारले जाणार आहेत. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा गुगल मीट किंवा व्हिडियो कॉन्फरसिंगद्वारे घ्यावयाच्या असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी http://sps.unipune.ac.in/ येथे भेट द्या.
—
अंतिम वर्ष परीक्षांचे नियोजन सुरू आहे. परीक्षांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पर्यायांचा परिस्थितीनुसार अवलंब करण्यात येईल. बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका असतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहेत, ते ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देऊ शकतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाहीत, ते ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देऊ शकतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या दोन्ही विद्यापीठांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान, (बॅकलॉग) विद्यार्थ्यांची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर आणि अंतिम वर्षांच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा १० ते ३१ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येईल.

प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवावे लागणार नाही. तर प्रयोगवहीचे (जर्नल) गुण, प्रात्यक्षिक परीक्षा किं वा तोंडी परीक्षा अशी गुणरचना करता येऊ शकते. परीक्षांच्या आयोजन प्रक्रियेत महाविद्यालयांना सहभागी करून घेतले जाणार आहे. परीक्षांबाबत चर्चा, नियोजन सुरू आहे. येत्या तीन ते चार दिवसांत संपूर्ण आराखडा निश्चित होईल.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ
???? for online paper to all students