पुणे – सावित्रीाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी सर्व महाविद्यालये येत्या ११ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. तसा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील ही महाविद्यालय आहेत. कोरोनामुळे ही सर्व महाविद्यालये सध्या बंद आहेत. महाविद्यालय सुरू करण्याबाबत विद्यापीठाने समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसारच महाविद्यालय सुरू होणार आहेत. सर्व अभ्यासक्रमांचे दुसऱ्या वर्षाचे वर्ग सुरू होणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन यावेळी केले जाणार आहे.