पुणे – पुणे ते फलटण डेमू रेल्वे सेवा उद्यापासून (३१ मार्च) सुरु होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत दूरदृष्य प्रणाली मार्फत या रेल्वे सेवेचा हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेतेही या समारंभात दूरदृष्य प्रणाली मार्फत सामील झाले. कृषी उत्पादन आणि कंपन्यांमुळे फलटण ते पुणे आणि इतर शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. रेल्वे, सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे. यामुळे पुणे ते फलटण रेल्वे सेवा नागरिकांना सोयीची ठरणार आहे.