नवी दिल्ली – २०२१ हे पुढचे वर्ष २०२० च्या तुलनेत अधिक संकटमय आणि वाईट राहणार आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक अन्न व कृषी संघटनेच्या (वर्ल्ड फूड प्रोग्राम ) प्रमुख डेव्हिड ब्यासले यांनी दिला आहे, त्यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार २०२० देण्यात आला. त्याप्रसंगी असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ब्यासले हे बोलत होते.
संयुक्त राष्ट्र संघाच्या अनेक पातळीवर कार्य करणाऱ्या जागतिक संघटना आहेत यात यंदा कोरोना काळात प्रामुख्याने जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक अन्न व कृषी संघटना यांचे महत्व जास्त वाढलेले दिसते . यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार वर्ल्ड फूड प्रोग्रामचे प्रमुख डेव्हिड ब्यासले यांनी स्विकारला . त्यावेळी ब्यासले यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोरोना काळात डब्ल्यूएफपीने उपाशी व भूकेने व्याकूळ लोकांसाठी मोठे कार्य केले तसेच याबाबात ठामपणे भूमिका घेतली आहे.
नोबेल पीस पुरस्कार प्राप्त संयुक्त राष्ट्र संघाच्या डब्ल्यूएफपीने पुढील वर्ष म्हणजे २०२१ मधील संकटाविषयी जागतिक नेत्यांना इशारा देण्यासाठी एक निवेदन दिले आहे. ब्यासले यांनी दावा केला की, २०२१ मध्ये उद्योग धंदे बंद असल्याने आणि जागतिक मंदी निर्माण होऊन दुष्काळ पडणार असून कोट्यवधी डॉलर्सशिवाय यावर उपाय योजना करणे शक्य होणार नाही , त्याकरिता मोठा निधी लागणार आहे.
दरम्यान,अमेरिकेच्या निवडणूक मतदान काळात कोरोना साथीचा रोग सर्व देशभर नव्हे सर्वत्र जगभरात पसरला याकडे आणि जागतिक नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी आणि आलेल्या अडचणीकडे लक्ष वेधून घेत ब्यासले म्हणाले की, जगभर आम्ही अनेक अडचणींचा सामना करीत आहोत.