नवी दिल्ली – ज्या क्षणाची संपूर्ण भारतवासिय आतूरतेने वाट पाहत आहेत ते कोरोना लसीकरण पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठीच देशभरात ड्राय रन घेण्यात आला असून तो यशस्वी झाला आहे. सरकारने लसीकरणाची जय्यत तयारी केली असून हे लसीकरण नक्की कसे होणार हे आता आपण जाणून घेणार आहोत.
सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) च्या कोरोनावरील सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (एसईसी) आपत्कालीन वापरास सिरम संस्थेच्या कोविशिल्ड या लसीस मंजुरीची शिफारस केली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी देशातील ड्रग कंट्रोलर जनरल (डीसीजीआय) व्ही.जी. सोमानी यांना पाठवले जाईल. ही मंजुरी मिळताच लसीकरणास प्रारंभ होईल.
पहिल्या टप्प्यात लसीकरण :
भारतात पहिल्या टप्प्यात ३०० दशलक्ष लोकांना लसी देण्याची तयारी सुरू झाली आहे. यात एक कोटी डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी, दोन कोटी सुरक्षा कर्मचारी समावेश आहे.
लसीकरणाची संपूर्ण तयारी :
आरोग्य मंत्रालय लसीकरणाच्या तयारीला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहे. देशभरात याची तालीम होईल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. या तालीमात ब्लॉक स्तरावर तयार करण्यात आलेल्या प्रतिसाद संघाची कार्यक्षमता देखील तपासली जाईल.
९६ हजार कर्मचार्यांना प्रशिक्षण :
कोरोनाच्या लसीकरण मोहिमेसाठी संपूर्ण देशात ९६ हजार जवानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लससाठी आवश्यक असलेल्या यंत्रणाची तयारी पूर्ण झाली आहे.
कोविशिल्ड भारतासाठी अनुकूल
अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फायझरच्या लसपेक्षा कोविशिल्टची लस स्वस्त आहे आणि ती राखणेही सोपे आहे. फायझर लसीच्या दोन डोसांची किंमत सुमारे तीन हजार रुपये असेल, तर सरकारला फक्त पाचशे रुपयांना दोन डोस सीरम लस मिळतील.
उणे ७० डिग्री सेल्सिअस तपमान
फायझरची लस ठेवण्यासाठी उणे ७० डिग्री सेल्सिअस तपमान असणे आवश्यक आहे, परंतु कोविशिल्ट सामान्य रेफ्रिजरेटरमध्ये म्हणजे दोन ते आठ डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवले जाऊ शकते.