मुंबई – पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने महाविकास आघाडीतील मंत्री शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर चौफेर हल्ला चढविल्याने हे प्रकरण राज्यभरात चर्चिले जात आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिलीच प्रतिक्रीया आली आहे. येथे आज झालेल्या एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. त्यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर आणि योग्य ती कारवाई केली जाईल. काही जणांना आयुष्यातून उठविण्यासाठी काही जण प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. चौकशीतून सत्य समोर येईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे.