नाशिक – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्यावतीने अमोनियम बायकार्बोनेट मोफत दिले जात आहे. यामुळे गोदावरीचे प्रदूषण रोखण्यात मोठी मदत होत आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिका हा उपक्रम राबवित आहे. त्यास नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने अमोनियम बायकार्बोनेटचे वितरण सहाही विभागात केले जात आहे. पूर्व विभागात ६५ नागरिकांना २०३.५ किलो ,पश्चिम विभागातील ६७ नागरिकांना १८९ किलो, पंचवटी विभागातील २६१ नागरिकांना ३८१ किलो, नाशिकरोड विभागातील ४२२ नागरिकांना १०५५ किलो, नवीन नाशिक विभागातील १५५ नागरिकांना ३४७ किलो, सातपूर विभागातील ९६ नागरिकांना ३१० किलो अमोनियम बायकार्बोनेट वाटप करण्यात आले
आहे.
अमोनियम बायकार्बोनेटसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा