नवी दिल्ली – EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय मंडळानं सदस्यांच्या ठेवींवर २०२०-२१ वर्षासाठी साडेआठ टक्के दरानं व्याज देण्याची शिफारस केली आहे. EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २२८ वी बैठक आज जम्मू-काश्मीर मध्ये श्रीनगर इथं केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सरकारच्या राजपत्रात व्याजदर अधिकृतपणे सूचित केल्यानंतर ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात व्याजदराची रक्कम जमा केली जाईल, असं गंगवार यांनी सांगितलं.