मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पिवळया जर्सीतला महेंद्रसिग धोनी

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 1, 2020 | 6:11 am
in इतर
0
SA i KAT 70161

मनाली देवरे

……

आयपीएल २०२० च्‍या सिझनमधली चेन्‍नई सुपर किंग्‍ज संघाची घोडदौड रविवारी संपणार आहे. किंग्‍ज इलेव्‍हन पंजाब विरूध्‍दचा सामना या आयपीएलमधील चेन्‍नईचा अखेरचा सामना असेल. विचार करा, जो संघ सन २००८ पासून सातत्‍याने एकदाही प्‍ले ऑफच्‍या बाहेर गेलेला नाही तो संघ आयपीएलच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच प्‍ले ऑफ मध्‍ये नसेल. चेन्‍नई सुपर किंग्‍ज आणि महेंद्रसिग धोनी यांचे एकमेकांशी असलेले नाते जितके घट्ट आहे तितकेच महेंद्रसिंग धोनी आणि त्‍याचे फॅन्‍स्‍ा यांचेही नाते घट्ट आहे.

यंदा कोवीडमुळे आयपीएल देशाबाहेर खेळवली जाते आहे म्‍हणून धोनीच्‍या फॅन्‍सचा अविष्‍कार फारसा बघायला मिळाला नाही. अन्‍यथा चेन्‍नई सुपर किंग्‍जचे होमग्राउंड असलेल्‍या चेपॉक मैदानात धोनीच्‍या फॅन्‍सनी हा पराभव देखील साश्रु नयनांनी डोक्‍यावर घेतला असता. अगदी स्‍वतःच्‍या शैलीत कोणत्‍याही प्रकारच्‍या गोलंदाजीच्‍या चिंधडया उडवण्‍याची ताकद असलेल्‍या धोनीला फलंदाजीतले पॉवरहाउस म्‍हणतात. धोनीकडे जितके गुण आहेत ति‍तके कुठल्‍याही क्रिकेटपटुमध्‍ये सापडत नाहीत. त्‍याच्‍या नावावर वैयक्‍तीक रेकॉर्डस कमी आहेत. तो वैयक्‍तीक आकडेवारीत कधीच रमला नाही परंतु, संपुर्ण कारकिर्दीत भारतीय संघाकडून खेळतांना किंवा आयपीएलमध्‍ये चेन्‍नईचे प्रतिनिधीत्‍व करतांना जिंकण्‍यासाठी जे काही आवश्‍यक आहे ते करून दाखवण्‍याचा संकल्‍प त्‍याने नेहमीच ठेवला.

शांत आणि थंड डोक्‍याचा धोनी म्‍हणजे डोक्‍यावर बर्फाची लादी घेवून हिमालयावर चढाई करणारा हिमपुरूष वाटतो. सध्‍या भारतीय संघ विराट कोहलीच्‍या नेत़त्‍वाखाली खेळतो आहे. मैदानावर एखादया क्षेञरक्षकाकडून झेल सुटला किंवा जास्‍तीच्‍या धावा गेल्‍या तर कॅमेरामन बाकी सगळया अॅक्‍शन टिपणे सोडून विराट कोहलीच्‍या चेह–यावर आपला कॅमेरा मुद्दाम झुम करून ठेवतो. पेक्षकांना जे आवडतं ते कॅमेरामन टिपत असतो हा जरी भाग सोडला तरी धोनी कर्णधार असतांना असे कधीच अनुभवायला मिळाले नव्‍हते. त्‍याच्‍या सोबत खेळणारे खेळाडू अनुभव शेअर करतांना सांगतात की “माही माञ सामना संपल्‍यावर अशा सगळया चुकांचा अगदी खरपुसपणे क्‍लास घ्‍यायचा”. त्‍याच्‍या थंड डोक्‍यात जी जरब होती तिचे वर्णन करणे कठीण आहे. आंतरराष्‍ट़ीय क्रिकेटमधून धोनीने निव़त्‍ती जाहीर केल्‍यानंतर, “खेळाडू येतील आणि जातीलही, परंतु धोनी सारखा शांत आणि संयमी डोक्‍याचा खेळाडू पुन्‍हा दिसणार नाही” असे व्टिट सचिन तेंडूलकरने केले होते.

त्‍याचे अनेक गुण आहेत त्‍यापैकी लिडरशीप हा आणखी एक गुण. भारताच्‍या सर्वोत्‍तम कप्‍तानांमध्‍ये त्‍याचे नाव कदाचित अग्रस्‍थानी नसेलही. पंरतु शिल्‍पकार जसा दगडातले शिल्‍प साकारतांना त्‍या दगडावर प्रेम करून त्‍यात शिल्‍प साकारतो तसा धोनीने भारतीय क्रिकेट संघ आणि चेन्‍नईचाही संघ घडवला. त्‍याने कोणत्‍याही खेळाडूवर अविश्‍वास दाखवला नाही. हाताखालील खेळाडूना संधी देण्‍याची वेळ आली त्‍यावेळेला त्‍याला संधी दिली. नव्‍या खेळाडूंवर विश्‍वास नव्‍हे तर जबाबदारी टाकली. काही सामन्‍यात शेवटचे षटक टाकण्‍याची जबाबदारी त्‍याने फारशा अनुभवी नसलेल्‍या गोलंदाजांवर टाकली त्‍यावेळेला अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या होत्‍या. पंरतु, क्रांती करण्‍याची हिम्‍मत असलेले लोक असलेच निर्णय घेतात आणि क्रांती घडवून आणतात. धोनीने अशी क्रांती कित्‍येकदा घडवून आणतांना अनेक चांगल्‍या खेळाडूंचे करीअर घडवले ही भारतीय क्रिकेटसाठी मोठी गुंतवणूक आहे.

लिडरशिप करतांना लिडरकडे सर्वप्रथम स्‍वतःची हुशारी असावी लागते. धोनीकडे क्रिकेटमधले पांडीत्‍य करण्‍याची हुशारी आहे. विकेटमागे उभे राहून तो फक्‍त विकेटकिपींग करत नाही तर फलंदाजांच्‍या चुका शोधतो आणि गरजेनुसार त्‍या चुकांचा डाटा गोलंदाजांना पुरवतो. डीआरएस हा प्रकार धोनीच्‍या कारकिर्दीत लॉन्‍च झाला. मैदानावरील पंचाच्‍या चुकीविरूध्‍द टीव्‍ही अंपायर दाद मागण्‍याची ही पध्‍दत धोनीने सर्वाधिक वापरली. डीआरएस चुकला तर संधी वाया जाते. परंतु, धोनीने डीआरएस घेतला आणि तो चुकला असे फारसे कधी झाले नाही. धोनीच्‍या डोळयात असलेला हाय रिसॉल्‍युशन कॅमेरा हे सगळं काही इतकं बारकाईने टिपतो की त्‍याला तोड नाही.

धोनीने या सगळया गुणांचा फायदा चेन्‍नई सुपरकिंग्‍ज संघाला आयपीएलच्‍या उगमापासून करून दिला आहे आणि म्‍हणूनच धोनी श्रेष्‍ठ आहे. सन २०१६ आणि २०१७ साली मॅच फिक्‍सींगचा आरोप असलेल्‍या चेन्‍नई संघावर आयपीएलमध्‍ये बॅन लादण्‍यात आला होता. या दोन सिझनचा अपवाद सोडला तर नेहमी किमान पहिल्‍या चार संघात स्‍थान टिकवण्‍याचे सातत्‍य या संघाने आत्‍तापावेतो दाखवले होते. परंतु, आता या सगळया इतिहासात प्रथमच चेन्‍नई सुपर किंग्‍ज संघावर स्‍पर्धेतून बाद होण्‍याचे दुदैव ओढावले आहे. पण मग याच वर्षी या चॅम्‍पीअन संघाला असं काय झालं की, त्‍यांना किमान प्‍ले ऑफची फेरी देखील गाठता आली नाहीॽ पराभवाची कारणकिमांसा करतांना या संघातील खेळाडूंच्‍या वाढत्‍या वयाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो.

क्रिकेटच्‍या मैदानावर वाढते वय लपवता येत नाही कारण तुमच्‍या खेळात कुठेतरी ते उघडे पडतेच. महेंद्र सिंग धोनीचे वाढते वय, या आयपीएल सिझनच्‍या आधी आणि सध्‍याची स्‍पर्धा सुरू असतांना देखील अनेकदा चर्चेचा विषय बनलेले आहे. त्‍याच्‍यावर प्रत्‍यक्ष, अप्रत्‍यक्ष टिका झाली. सोशल मिडीयावर मिम्‍सच्‍या माध्‍यमातून खमंग चर्चाही झाली. परंतु, वाढते वय ही काही एकटया धोनीचीच अडचण नसून ती संपुर्ण चेन्‍नई सुपर किंग्‍ज संघाचीच अडचण होवून बसली होती. संघ निवडतांना सीएसकेच्‍या संघ व्‍यवस्‍थापनाने अनुभवाला प्राधान्‍य दिले आणि त्‍यामुळेच हा सगळा खोळ झाला.

हसी दौर की एक कहानी छीन लेता है.
वक्‍त तजुर्बा तो देता है पर जवानी छीन लेता है.

चेन्‍नईकडून संघ निवडतांना माञ खेळाडूंच्‍या वाढत्‍या वयाचा विचार केला गेलाच नाही. धोनीशिवाय चेन्‍न्ई सुपरकिंग्‍ज, अशी कल्‍पना देखील अशक्‍य होती (कदाचित ती पुढच्‍या वर्षी देखील शक्‍य नसेल !). मग त्‍यांनी धोनीची निवड केली. त्‍याची कर्णधार म्‍हणून घोषणाही केली. सुरेश रैना, हरभजन सिंग हे संघात सध्‍या नसले तरी त्‍यांचीही निवड झाली होती हे विसरून चालणार नाही (नंतर त्‍यांनी वैयक्‍तीक कारणास्‍तव स्‍पर्धेतून माघार घेतली). २०२० च्‍या आयपीएलमध्‍ये सर्व संघात मिळून “जेष्‍ठ” असलेला दक्षिण आफ्रीकेचा लेग स्‍पिनर इम्रान ताहीर (वय ४१) त्‍यांनीच निवडला. चाळीशीच्‍या उंबरठयावर आलेले ब्राव्‍हो, वॉटसन संघात घ्‍यावे लागले. थोडक्‍यात सांगायचं झालं तर, या प्रक्रियेत जे काही २३ खेळाडू निवडले गेले त्‍यापैकी १६ खेळाडू हे तिशीच्‍या पुढच्‍या वयातले निवडण्‍यात आले. फक्‍त दोन खेळाडू यासंघात अगदीच तरूण आहेत. त्‍यापैकी एक म्‍हणजे २२ वर्षाचा सॅम करण हा परदेशी खेळाडू आणि वयाच्‍या चोवीशीच्‍या उंबरठयावर असलेला ॠतुराज गायकवाड हा भारतीय खेळाडू.

अशा प्रकारे आयपीएल–२०२० मध्‍ये जे आठ संघ सहभागी झाले आहेत त्‍यापैकी सर्वाधिक जास्‍त सरासरी वय असलेल्‍या खेळाडूंचा संघ म्‍हणून चेन्‍नई सुपर किंग्‍जला पहिले स्‍थान मिळाले. या संघातील खेळाडूंचे सरासरी वय आहे ३०.५ वर्ष. या वर्षी ८ संघामध्‍ये सर्वाधिक कमी सरासरी वय असणा–या संघाच्‍या यादीत राजस्‍थान रॉयल्‍सचा पहीला नंबर लागतो. त्‍यांच्‍या संघाचे सरासरी वय आहे २५.८० वर्षे. त्‍या खालोखाल कोलकाता नाईट रायडर्स (सरासरी वय २६.८४) आणि दिल्‍ली कॅपीटल्‍स (सरासरी वय २६.९१ ) यांचा नंबर लागतो. हा भला मोठा फरक चेन्‍नईच्‍या संघ व्‍यवस्‍थापनाकडून कडून दुर्लक्षीत झाला. आधीच लॉकडाउन काळात खेळाडूंना सराव करता आलेला नाही. वाढत्‍या वयावरोबर लॉकडाउनने खेळाडूंचे वजन देखील वाढवून ठेवले आहे. त्‍याचा परिणाम काही खेळाडूंच्‍या कामगिरीवर होतांना दिसतो आहे. त्‍यात, अबुधाबी, दुबई आणि शारजा येथील हवामानाचा आणि वातावरणाच्‍या विचार केला, तर या वाळवंटी प्रदेशात कायम उष्‍ण तापमान असल्‍याने २०–२० सारखे वेगवान क्रिकेट खेळण्‍यासाठी फिटनेस सोबत खेळाडूंची या वातावरणात तग धरण्‍याची क्षमता देखील पणाला लागते आहे. परंतु, या परिस्थितीचा विचार चेन्‍नईने संघ निवडतांना न केल्‍याने त्‍याचा फटका त्‍यांना बसतो आहे.

सुनील गावस्‍करने एका सामन्‍यात समालोचन करतांना चेन्‍न्‍ाई सुपर किंग्‍जच्‍या या जेष्‍ठत्‍वावर बोलतांना आणखी एक धोका व्‍यक्‍त केला आहे. त्‍यांच्‍या मते पुढल्‍या वर्षी देखील याचा फटका चेन्‍नई संघाला बसु शकतो. यावर्षी सपशेल अपयशी ठरलेले आणि वय वाढलेले खेळाडू पुढल्‍या वर्षी संघातून एकाच वेळी बाहेर काढावे लागले तर विजेतेपदासाठी एक नविन टीम तयार करायला चेन्‍नईला वेळ लागेल.

दीवार की पपडी उतरने लगी है
लगता है अब दीवार हटाई जाएगी.

हा शेर सध्‍या चेन्‍नई संघाला चपखलपणे लागू होतो. चेन्‍नई सुपर किंग्‍जचे फॅन्‍स खुप मोठया प्रमाणावर आहेत. ते या संघावर जीवापाड प्रेम करतात. महे्ंद्रसिंग धोनी हा अनेकांचा देव आहे. तितकी क्षमता त्‍याच्‍यात आहे देखील. विजयानंतर उडया मारणारे चेन्‍नईचे फॅन्‍स पराभवानंतर रडतांना सुध्‍दा बघायला मिळतात. चेन्‍नई संघ व्‍यवस्‍थापनाने तर असेही जाहीर केले आहे की पुढच्‍या वर्षी धोनी हाच आमचा कर्णधार असेल. कदाचीत असेलही किंवा नसेलही. परंतु या फॅन्‍सना आता संघातील खेळांडूच्‍या वाढत्‍या वयामुळे पुढल्‍या वर्षीच्‍या संघात आमुलाग्र बदल झालेले बघावेच लागतील, कारण तीच काळाची गरज असेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अक्षर कविता – राजेंद्र वाघ यांच्या ‘शब्दब्रम्ह’ कवितेचे अक्षरचित्र

Next Post

अनोखी गांधीगिरी; योग्य भाव न मिळाल्याने संपूर्ण पीकच मोफत दिले…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधिक फोटो

अनोखी गांधीगिरी; योग्य भाव न मिळाल्याने संपूर्ण पीकच मोफत दिले...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime11

नाशिक शहरातील तिघांना महिलेने घातला तब्बल ४१ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

ऑगस्ट 19, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय….

ऑगस्ट 19, 2025
Untitled 32

इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची केली घोषणा

ऑगस्ट 19, 2025
Jitendra Awhad

कीर्तनकाराने दिली बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी…जितेंद्र आव्हाड यांनी केला असा निषेध

ऑगस्ट 19, 2025
crime 71

धक्कादायक….पत्नीचा खून करुन पतीने गळफास लावून केली आत्महत्या, नाशिकच्या अंबड येथील घटना

ऑगस्ट 19, 2025
accident 11

भरधाव आयशर ट्रकची कारला धडक…अपघाताचा जाब विचारल्याने कारचालकास जीवे ठार मारण्याची धमकी

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011