पिंपळनेर- पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टेेंभा जवळील भोयाचापाडा येथे छापा टाकून ८८,२९० किलो गांजा जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. त्यात क्षेत्र गट नं .१८ / १ पैकी क्षेत्र २.७५ शिवाजी नगर येथे मगन काळु कोकणी ( चौरे ) यांनी शेतात लावलेले सुमारे ८८,२ ९ ० कि. ग्रॅम मानवी मनावर परीणाम करणारा पदार्थ गांजा सदृश्य हिरवे झाडे ८८,२ ९ ० कि. ग्रॅम वजनाचे मिळून आले. ही सर्व झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणात राजू मगन कोकणी (चौरे) रा . टेंभा पैकी भोयाचापाडा , ता . साक्री , जिल्हा धुळे याच्या विरूध्द पिंपळनेर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर , पोलीस उप निरीक्षक , भूषण हांडोरे रविंद्र केदार, आर . एन . कोकणी, आर.जी. शेख, आर . पी . वळवी, प्रकाश सोनवणे,निलेश महाजन, भुषण वाघ,विशाल. मोहने,ग्यानसिंग पावरा,प्रशांत शिंपी, एम.ए.पाटील, आर.पी. राठोड , एस . ए.मोहिते, रविंद्र सुर्यवंशी, पंकज वाघ, फुला कोकणी, वंदना पाटील, वंदना भामरे,रवींद्र. राजपुत, दावल सैंदाणे यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास दिलीप खेडकर सहा.पोलीस निरीक्षक करीत आहेत.