पिंपळनेर – धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मौजे करंजटी येथे नाबार्डच्या अर्थ सहायाने व लुपिन फाऊंडेशनद्वारे हवामान बदल अनुकूलन कार्यक्रम राबविला जात आहे , सदर प्रकल्पातंर्गत, मृदा व जल सवर्धन, माती परीक्षण, कृषी सल्ला केंद्र ,गांडूळ खत युनिट, परसबाग, सिमेंट बंधारा, मृदा पोषण व्यवस्थापन, स्थानिक नागरिक क्षमता विकास व प्रशिक्षण यासारखे अनेक उपक्रम राबविले जात आहेत,बदलत्या हवामानामुळे कृषी पद्धतीत,लोकांच्या जीवनमानावर अभुतपूर्व बदल व परिणाम होत आहेत, त्यामुळे बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन शाश्वत विकास साध्य करण्यासाठी असे प्रकल्प मोठी भूमिका बजावतात, याच प्रकल्पा अंतर्गत ३ नोव्हेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील शास्त्रज्ञ डॉ.दिनेश नांद्रे, डॉ.पंकज पाटील, डॉ.धनराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली “बदलत्या हवामाननुसार जुळवून घेऊन कृषी पीक पद्धतीतील वैविध्यपूर्ण पीक घेण्याविषयी तसेच पशुधनाचे आरोग्य, शेतीतील शाश्वत उत्पादकता ” अशा अनेकविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले, सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते,सदर कार्यक्रमास लुपिन फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक निलेश पवार ,अभियंता किशन देवरे ,रोहित दाभाडे,राजेंद्र पगारे उपस्थित होते. कार्यक्रमास प्रकल्प प्रमुख योगेश राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.