पिंपळनेर – समाजामध्ये दोन प्रकारच्या स्त्रीया असतात. एक निमूटपणे सहन करणारी आणि दुसरी साहसी वृत्तीची. निमूटपणे सहन करणारी स्त्री जिथे आहे तिथेच आहे. परंतु साहसी स्त्री मात्र परिवर्तनवादी असते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे यांनी केले. ते पिंपळनेर येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान महाविद्यालय, पिंपळनेर यांच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉलेज कमिटीचे चेअरमन धनराज राजमल जैन तर उद्घाटक म्हणून धुळे येथील प्रा. डॉ. उषा साळुंखे, सि. गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे, परिक्षक म्हणून प्रा. डॉ. पौर्णिमा वानखेडे (धुळे) व श्री. भागवत सोनवणे (धुळे) हे उपस्थित होते.
प्राचार्य सोनवणे पुढे म्हणाले की, स्त्रीया आज अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. त्यांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे परंतु आजही स्त्री सुरक्षित नाही. आज टीव्हीवरील वेगवेगळ्या स्त्रीप्रधान मालिकांमुळे ग्रामीण भागातील स्त्रीयांमध्ये हळू-हळू बदल होताना दिसत आहेत. कोणताही बदल होण्यास खुप कालावधी लागतो. परंतु आज महिला अनेक क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत. हे जागतिक महिला दिनाचे फलित आहे असेही ते म्हणाले.
प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे म्हणाले की, स्त्रियांचे सौंदर्य हे छोट्या छोट्या गोष्टीत अर्थात त्यांचे चालणे, बोलणे, वागणे यामध्ये असते. त्यांच्या अंगी नम्रता, सहनशीलता इ. गुण असतात. हे गुण म्हणजे त्यांचा कमकुवतपणा नसून त्यांची शक्ती असते. घरात आई, बहिण, पत्नी यांच्याशी बाहेरील छोट्या – छोट्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. प्रा. डॉ. उषा साळुंके आपल्या उद्घाटनपर मनोगतात म्हणाल्यात की, आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणींनी तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य पद्धतीने केला पाहिजे. सौंदर्य हे दिसण्यात नसून आपल्या कलाकृतीत आहे. सौंदर्याचा अभिमान बाळगू नका आणि न्यूनगंड देखील बाळगू नका. आपले मत ठामपणे व्यक्त करायला शिका असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. धनराज शेठ जैन म्हणाले की, महाविद्यालय अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवित असते याचा मला विशेष आनंद आहे.
या स्पर्धेत एकूण २१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यातील
१. प्रथम क्रमांक: रु. २१००/- रोख
– कु. चौधरी रूपाली कन्हैयालाल* (कर्म. आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर)
२. द्वितीय क्रमांक: रु. १५००/- रोख
– कु. महाजन हिमानी विकास* (डॉ. जी. डी. बेंडाळे महाविद्यालय, जळगाव)
३. तृतीय क्रमांक: रु. १०००/- रोख
– गवळी निशा जानकीराम (सी. गो. पाटील महाविद्यालय, साक्री)
हे विजेत्या पदाचे मानकरी ठरले आहेत. परिक्षकांच्या वतीने प्रा. डॉ. पौर्णिमा वानखेडे यांनी मनोगत व्यक्त