आयएसओ मानांकित जिप सेमी इंग्रजी शाळा छाईलने जोपासली सामाजिक बंधीलकी
पिंपळनेर – साक्री तालुक्यातील जिप शाळा छाईल येथील शैक्षणिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी “शाळा बाहेरची शाळा भरली मळ्यात ” हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे कर्तव्य पार पाडताना छाईल शाळेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा फंडा वापरला जात आहे. परंतु, त्यातही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मुलभूत गरजा ही पूर्ण करू न शकणाऱ्या पालकांच्या पाल्यांना अँड्रॉइड मोबाइल घेणे व त्याला दरमहा नेट पॅक मारणे शक्य होऊन शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळा छाईल तालुका साक्री जिल्हा धुळे केंद्र नाडसे येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी छाईल येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षकांसाठी मळ्यात पोहचून “शाळा बाहेरची शाळा भरली मळ्यात” हा एक अभिनव उपक्रम सुरू करीत एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.विद्यार्थ्यांच्या मळ्यात जाऊन थेट रेडियो प्रसारण ऐकवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. ही जबाबदारी पार पाडत असतांना शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पाठ्यपुस्तके ,लेखन साहित्य पोहोचवून शैक्षणिक कार्य करीत आहेत.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाईल शाळेचे मुख्याध्यापक डी.डी महाले सर, शिक्षिका श्रीमती संगिता मोरे ,श्रीमती रत्नमाला देवरे, श्रीमती मीना हीरे,श्रीमती जयश्री जाधव, योगेश्वर गिरासे हे सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत .या कामी गावातील सर्व पालक शालेय व्यवस्थापन समितीचे आदिवासी सदस्य अशोक रावण गायकवाड ,अध्यक्ष व सदस्य ,माजी विद्यार्थी यांचे सहकार्य मिळत आहे .”आदिवासी मुलांना शिक्षणात अनेक अडचणी येतात ,त्यात कोरोना आणि लॉक डाऊन मुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळविणे गैरसोयीचे होत असल्याने त्यांच्या शिक्षणाची अडचण दूर करून त्यांना शिकवण्याचे मनाला समाधान मिळत आहे “असे शाळेचे मुख्याध्यापक डी डी महाले यांनी सांगितले.या संदर्भात कासारे बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.व्ही पवार साहेब ,नाडसे केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीम.सोनवणे मॕडम यांचे मार्गदर्शन मिळाले.