धुळे – गेल्या अनेक महिन्यांपासून पिंपळनेर शहरात टवाळखोरांच्या दहशतीने डोके वर काढले असून नागरिक त्रस्त झाले आहे. या टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक नागरिक करत आहे. गेल्या काही दिवसापासून शहरात एक टोळी सक्रिय झाली आहे. नागरिकांनी स्थानिक पोलिस प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्या. पण, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. हे टवाळखोर सटाणा रोड, हस्ती बँक, बाजार पेठ, बस स्टॅन्ड, नाना चौक परिसरात मद्यपान, धूम्रपान, भरधाव वेगाने गाड्या चालवतात. त्यामुळे शहरातील मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही टोळी मुलींची छेड़ काढणे, वयोवृध्द माणसांची वाद घालणे, असे प्रकार करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पोलीस प्रशासनाने कारवाई करावी
टवाळखोरांमुळे शहरातील अल्पवयीन मुलींना बिनधास्तपणे गावात वावरता येत नाही. मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने या टवाळखोर मुलांवर कारवाई करावी.
तुषार मधुकर पगारे, सामाजिक कार्यकर्ता,पिंपळनेर