पिंपळनेर – रावेर येथील बोऱखेडा जवळ अल्पवयीन बहिणी-भावांचा अमानवीय हत्याकांडाच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आदिवासी बचाव अभियान धुळे जिल्हा कार्यकारणी व एकलव्य आदिवासी युवा पिंपळनेर यांनी केली आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी या संघटनेतर्फे पोलिस स्थानकात निवेदनही देण्यात आले.
आदिवासी परिवार १० वर्षापासून बोऱखेडा गावाजवळ शेतात सालदारकी करून आपले उदरनिर्वाह करत होता. त्याना तीन मुले, दोन मुली असा परिवार होता, आई-वडिल दशक्रियाचा कार्यक्रमासाठी परगावी गेलेले असल्याने घरी शेतात चार लहान भांडे होते. याचा फायदा घेत अपरात्री अनोळखी नराधमांनी कु-हाडीने चौघांना निर्दयी बालकांना निर्घू्ण हत्या केली. याबाबत पोलीस प्रशासनाकडून जलद गतीने सखोल चौकशी करून या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अशी मागणी या संघटनांनी केली आहे. योग्य कारवाई न झाल्यास समाजातील लोक, संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहाणार नाही.पोलिस स्थानकात निवेदन देतांना तानाजी बहिरम अध्यक्ष धुळे, श्रीमती प्रतिभाताई चौरे महिला संघटक महा. राज्य, कन्हैयालाल माळी ए.आदिवासी युवा, ललित चौरे, मन्साराम भोये संरपच नवेनगर, राजेंद्र बहिरम,गणेश गावीत, चंद्रकांत जगताप,उपाध्यक्ष आदिवासी महासंघ,साक्री, विश्वास सोनवणे, गणेश ठाकरे,नंदकिशोर ठाकरे यांनी केली आहे.