अक्षय कोठावदे, पिंपळनेर
साक्री तालुक्यातील पिंपळनेर उपकेंद्रात लक्ष्मीपूजनच्या दिवशी दुपारच्या सुमारास पिंपळनेर परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला त्यावेळी सहाय्यक अभियंता उन्मेष पाटील आणि यंत्रचालक बाळू चौधरी व वाल्मिक तोरवणे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दुपारच्या सुमारास पिंपळनेर वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने पॅनलमध्ये अचानक जाळ झाल्याने संपूर्ण पिंपळनेर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला त्यावेळी लगेच, सहाय्यक अभियंता उन्मेश पाटील यांनी उपकेंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ उपकेंद्रात येण्याचे सांगितले त्यामुळे पिंपळनेर शहरावर आलेले मोठे संकट टळले व पिंपळनेर करांची दिवाळी आनंदात साजरी झाली.
याप्रसंगी वरिष्ठ तंत्रज्ञ ,नितिन नंदन,दीपक मोरे,कैलास सूर्यवंशी, तंत्रज्ञ जगदीश देसले निलेश कामे, योगेश भदाने, योगेश देवरे, हे सर्व कर्मचारी दिवाळीची सुट्टी असताना कर्मचारी तात्काळ उपकेंद्रात हजर झाले व पॅनल ला लागलेली आग लवकरात लवकर आटोक्यात आणली यामुळे पिंपळनेर विज उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचा कर्तव्यदक्ष पणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
पॅनलला लागलेली आग आटोक्यात आणली
मला व माझ्या सहकाऱ्यांना सहाय्यक अभियंता उन्मेष पाटील यांचा फोन येताच आम्ही सर्व आमच्या जिवाची पर्वा न करता उपकेंद्रात हजर झालो व पॅनलला लागलेली आग आटोक्यात आणली ही आग लवकरात लवकर आटोक्यात आली नसती तर पिंपळनेर शहरातील सर्व नागरिकांना आपली दिवाळी ही अंधारात साजरी करावी लागली असती.
जगदीश देसले, ( तंत्रज्ञ, पिंपळनेर वीज उपकेंद्र )