पिंपळनेर: साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टया मधील कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण लक्ष्यात घेता, पिंपळनेर परिसरात, कोविड सेंटर असावे या परिसरातील लोकांची मागणी होती आणि या मागणीचा विचार करून आ.मंजुळाताई गावीत यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार,जिल्हाधिकारी संजय यादव यांना विनंती केली की,पिंपळनेरसह आदिवासी पश्चिम पट्यातील ही परिस्थिती हाताबाहेर जाण्या आगोदरच कोविड सेंटर पिंपळनेर येथे सुरू करा , या मागणीला प्रतिसाद देत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिल्यानंतर ४ एप्रिल रोजी पिंपळनेर ग्रामीण रुग्णालय येथे २४ बेड ऑक्सिजनयुक्त सेंटरचे उद्घाटन आ. मंजुळाताई गावित यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी, विभागीय प्रांत अधिकारी भिमराव दराडे,तुळशीराम गावित,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नवले, धुळे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ.सांगळे,अप्पर तहसीलदार विनायक थविल, गट विकास अधिकारी जे.टी.सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.राकेश मोहने,डॉ. भूषण जोशी,डॉ, भामरे, डॉ. मुक्ते, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर,अॅड.ज्ञानेश्वर एखंडे,स्वीय सहाय्यक अजित बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.मंजुळा गावीत यांनी या प्रसंगी ग्रामीण भागातील जनतेला कळकळीचे विनंती केली आहे. जर कोणालाही कोविडची लक्षणे असतील तर अंगावर न काढता ताबडतोब कोरोना टेस्ट करा आणि उपचार घ्या.