पिंपळनेर – कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील उर्फ कै.बंडू बापूजी यांच्या ४० वी पुण्यतिथी निमित्त विद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. -सदर स्पर्धा covid-19 या वैश्विक महामारीचा विचार करून सर्व शासकीय नियमांचे पालन करत बापुजींची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब आर. एन. शिंदे, (पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष) श्रीमती सुदामती गांगुर्डे, (धुळे जिल्हा परिषद सदस्य), नथू दगा दंडगव्हाळ ( कविवर्य कुसुमाग्रज शिरवाडकर विद्यालय शिरवाडेवणी) , डॉक्टर संजय शिंदे प्राचार्य जिजामाता शिक्षण शास्त्र महाविद्यालय नंदुरबार तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस टी सोनवणे, स्कूल कमिटी चेअरमन सुभाषशेठ जैन, कॉलेज कमिटीचे चेअरमन धनराजशेठ जैन, वस्तीगृह चेरमन एच .आर .गांगुर्डे, प्राचार्य ए .बी .मराठे सर्व शाखेवरील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक , प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक या सर्व मान्यवरांच्या हस्ते समाधी पूजन करण्यात आले तसेच दीपप्रज्वलनाने राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेचे उद्घाटन माजी शालेय समिती चेअरमन रामचंद्र पुंडलिक भामरे व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
-या कार्यक्रमाचे औचित्य साधून पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ॓ मातोश्री आबाई तथा नर्मदा नारायण पाटील योग विद्या शिक्षक पदविका ॔ अभ्यासक्रमाचे फलक अनावरण माननीय डॉक्टर प्राचार्य संजयजी शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ए. बी.मराठे यांनी केले. नथ्थू दगा दंडगव्हाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की मला भावलेले विनोबा भावे यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान याबद्दल आपले मत मांडले तसेच शिक्षकांनी फक्त शिक्षक न राहता आचार्य होण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. तसेच प्राचार्य डॉक्टर संजय जी शिंदे यांनी मानवी जीवनासाठी योग किती लाभदायक आहे हे पटवून दिले.
नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. या या विषयावरील वादविवाद स्पर्धेत २८ विद्यार्थी संघांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला होता त्यातून ७ स्पर्धकांनी व्यासपीठावर आपली मते मांडली सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रुती अशोक बोरस्ते एस .पी. डी .एम कॉलेज नाशिक या विद्यार्थीनीने पटकाविला, द्वितीय क्रमांक उद्देश कृष्णा पवार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , तृतीय क्रमांक योगेश्वरी राजेंद्र बिरारीस सी.गो .पाटील महाविद्यालय साक्री , ढाल विजेता संघ ढमाले अनिकेत प्रल्हाद व चौधरी ऋषभ सुशील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना देण्यात आला. सदर स्पर्धेचे परीक्षण व्ही .एम .भोसले, एच .डी पाटील, विपुल सर यांनी केले.ए. एच आहेर, एम एस जाधव ,एस ए. शिपी यांनी प्रमुख अतिथी यांचा परिचय करून दिला. के. यु. कोठावदे व एस. पी. एखंडे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. एस. ए .शिंपी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.