पिंपळनेर येथे राहणारे व जिल्हा परिषद शाळा सावरपाडा येथे कार्यरत प्राथमिक शिक्षक रविंद्र जाधव यांनी निर्माण केलेल्या ‘थाळसर-बांगसर’या लघुपटाला राष्ट्रीय मानवाधिकार नवी दिल्लीचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला. खान्देशच्या पश्चिम पट्ट्यातील लोप पावत चाललेल्या थाळसर बांगसर या वाद्यावर आधारित हा लघुपट आहे.
या लघुपटाचे चित्रीकरण सावरपाडा आणि टाकरमौली या गावात झाले आहे. स्थानिक कलाकारांचा यात सहभाग आहे. याअगोदर देखील प्राथमिक शाळेवर शिक्षक असलेल्या रविंद्र जाधव यांनी शाळाबाह्य, प्रखर ,निरोध अशा लघुपटाची निर्मिती, लेखन व दिग्दर्शन केले आहे. या स्पर्धेकरिता देशभरातून लघुचित्रपट आले असता रवींद्र जाधव यांच्या निर्मितीला प्रथम क्रमांक मिळाल्याने खानदेशचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.
असा आला विषय समोर
या लघुपटाचे लेखन,दिग्दर्शन, निर्मिती रवींद्र जाधव यांची असून,छायांकन भूषण गनूरकर,संकलन-दीपक देशमुख,कला-चेतन बहिरम, संगीत-दोधा पवार,छायांकन सहकार्य-प्रतीक कुंभार,ध्वनी संकलन-रेडियो पांझराचे आर.जे.जयवंत कापडे ,राहुल ठाकरे,इंग्रजी भाषांतर- रोहिदास घरटे यांचं असून यामध्ये मुख्य भूमिकेत-दोधा पवार,दिव्या गायकवाड ,छोटीराम चौरे, राणी बहिरम आणि रवींद्र बहिरम हे स्थानिक कलाकार आहेत.या करिता टाकरमौली आणि सावरपाडा येथील नागरिकांचे सहकार्य लाभले.
लोप पावत असलेली आदिवासी संस्कृती जपण्याचा प्रयत्न
जयंवत कापडे
ध्वनी संकलक तथा आरजे रेडियो पांजरा