पिंपळनेर – जागतिक पातळीवर कोरोना व्हायरस अगर या महाआपत्तीतून संपूर्ण मानव जातीवर फार मोठे संकट आले आहे. प्रत्येक देश या आपत्तीशी संघर्ष करीत आहे. वेळोवेळी लॉकडाऊन यामुळे सर्व जीवनपद्धतीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रसंगी सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असतांना आजच्या रक्तदान कार्यक्रमाप्रसंगी रक्तदान करणारे जे आहेत ते सुद्धा महान योद्धा आहेत. तुमच्या रक्तदानातून कुणाचा तरी जीव वाचविण्याचा तुमचा प्रयत्न म्हणजे हे अतिश्रेष्ठ कार्य तुम्ही करीत आहात. त्याचे मूल्य कोणीच करू शकत नाही. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे यांनी केले. ते पिंपळनेर येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकका मार्फत रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय, मुंबई व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या आवाहनानुसार पिंपळनेर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एकका मार्फत रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आलेॉ. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य बापूसाहेब डॉ. एस. टी. सोनवणे अध्यक्षस्थानी होते तर कर्म. आ. मा. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब ए. बी. मराठे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सी. एन. घरटे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एम. सावळे व प्रा. वाय. एम. नांद्रे यांनी केले. रा. से. यो. चे स्वयंसेवक, एन. सी. सी. कॅडेट्स, कर्म. आ. मा. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी रक्तदान करून मोलाची कामगिरी पार पाडली.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ. डब्ल्यू. बी. शिरसाठ, डॉ वाय. एस. मोरे , प्रा. एल. जे. गवळी, डॉ. सतीश मस्के हे उपस्थित होते . कार्यक्रमास शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे स्वच्छता, सॅनिटाईझेशन व सेट उभारणीच्या दृष्टीने विशेष सहकार्य लाभले. रक्तसंकलन मालेगांव येथील सेवाभावी संस्था, मालेगाव ब्लड बँक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन कार्यक्रम अधिकारी प्रा. सी. एन. घरटे यांनी केले. तर आभार प्रा. पी. एम. सावळे यांनी मानले.