पिंपळनेर – हवामान बदलांचा पिकावर होणारा परिणाम आणि उपाययोजना, या विषयी लुपिन फाउंडेशन धुळेतर्फे साक्री तालुक्यातील करंझटी या गावातील ३५ शेतकऱ्यांच्या अभ्यास सहलीचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार येथे करण्यात आले होते. साक्री तालुक्यातील करंझटी या आदिवासी बहुल गावात हवामान बदलाविषयीचा प्रकल्प लुपिन फाउंडेशन नाबार्डच्या सहकार्याने राबवीत आहे. या अभ्यास सहलीदरम्यान केव्हीने नंदुरबारच्या प्रक्षेत्रावरील रेन वाॅटर हार्वेस्टिंग,पोषक परस बाग नियोजन,चारा पिके,एकात्मिक कीड व्यवस्थापन ई विषयी प्रक्षेत्र व्यवस्थापक राजेश भावसार यांनी माहिती दिली. याच प्रक्षेत्रावर शेतक-यांसाठी उभारण्यात आलेल्या स्वयंचलित तापमान आणि पावसाच्या नोंदणी यंत्राचे कार्य आणि उपयुक्तता या विषयी विषय विशेषज्ञ सचिन फड यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. मार्गदर्शनाच्या सत्रामध्ये केव्हीके नंदुरबारचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी आयसीयेआर अंतर्गत सुरु असलेले कृषी संशोधन व जोडव्यवसाय, विषय विशेषज्ञसचिन फड यांनी ‘मेघदूत’ आणि ‘दामिनी’ या शासकीय मोबाईल अप्लीकेश्न्सचा उपयोग आणि करावयाची शेती कामे , पिक संरक्षण विभागाचे विषय विशेषज्ञ पद्माकर कुंडे यांनी वातावरण तपशील आणि पिकावरील रासायनिक,जैविक,पर्यावरण पूरक कीड नियंत्रण व्यवस्थापन,उमेश पाटील विषय विशेषज्ञ यांनी बदलत्या हवामानात पिक उत्पादनातील धोके,जयंत उत्तरवार, विषय विशेषज्ञ यांनी श्रम कमी करणारी अवजारे या विषयी सखोल मार्गदर्शन व शेतकर्यांच्या शंकांचे समाधान केले.लुपिन फाउंडेशन धुळे चे अभियंता किशन देवरे,विभाग समन्वयक रोहित दाभाडे,रेडिओ पांझराचे केंद्रसमन्वयक राहुल ठाकरे,विजय खैरनार,पॅरावर्कर विश्वास साबळे यांची उपस्थिती होती.