पिंपळनेर (ता. साक्री) – वीजेचे नवे मीटर देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना संजय कौतिक माळी या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करण्यात आली आहे. घरगुती नवीन मीटरसाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. या मीटरपोटी ४ हजार देण्याची मागणी माळी याने केली होती. अखेर हे पैसे घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माळी यास रंगेहाथ पकडले आहे. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, उपअधिक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सरग,सुधीर सोनवणे, प्रशांत चौधरी,कृष्णकांत वाडीले, भुषण शेटे यांनी यशस्वी केला.









