पिंपळनेर, ता साक्री – बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्वौच्च न्यायालयाने दोषींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केल्याने भाजपातर्फे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एसटी स्टँड चौफुलीवर सर्व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व घोषणा देऊन आनंद व्यक्त केला. यावेळी भाजप जिल्हाउपाध्यक्ष, अध्यक्ष, सरचिटणीस सर्व पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू संघटनांचे सर्व पदाधिकारी या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. यावेळी जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच, न्यायालयाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.