पाच दिवस सर्व दुकाने बंद
साक्री – पिंपळनेर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक संसर्ग टाळण्यासाठी गुरुवार २७ ऑगस्ट ते सोमवार १ सप्टेंबर (गणेश विसर्जन) पर्यंत जनता कर्फ्यु निश्चित करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी वगळता कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील दोन दिवसात दैनंदिन कामाचे नियोजन करावे. दूध विक्रीसाठी सकाळी ६ ते ७ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेतच दुकाने सुरु राहतील असे माहिती पत्रकात नमूद करण्यात आले आहे. संबंधित काळात मेडिकल, भाजीपाला, फळे, किराणा, कृषी सहित दुकाने संपुर्ण बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. फक्त दुकाने बंद ठेऊन ही साखळी तोडणे शक्य नसून जनतेने या काळात पुर्णपणे घरातचं राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्फ्यु काळात कोणीही रस्त्यावर फिरतांना किंवा मालाची खरेदी विक्री करतांना आढळल्यास प्रशासनामार्फत १४ दिवस सक्तीचे विलगीकरण करण्यात येईल. त्याचप्रमाणे जवळच्या गावातील नागरिकांनी पिंपळनेर येथे फिरू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नियमभंग केल्यास कडक कारवाईचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.