औरंगाबाद – पिंपळनेर (ता. साक्री) येथील लोकनियुक्त सरपंच साहेबराव आनंदा देशमुख यांना औरंगाबाद खंडपीठाने जात पडताळणीच्या निर्णयाविरुध्द दिलेली स्थगिती उठवली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहे. ही स्थगिती उठवतांना खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ५ अॅाक्टोंबर पर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश सोनु पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.
राज्यातील दुस-या क्रमांकाची ग्रामपंचायत असलेल्या पिंपळनेर येथे १७ सदस्य असून गावाची लोकसंख्या २३ हजाराच्या आसपास आहे. या ग्रामपंचायतीमध्ये साहेबराव पाटील यांची सप्टेंबर २०१८ मध्ये निवड झाली होती. त्यानंतर त्यांना वर्षभरात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत होती. पण, त्यांनी ते सादर न केल्यामुळे प्रकाश पाटील यांनी त्याविरुध्द धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मार्च २०२० मध्ये जात पडताळणी समितीने देशमुख यांच्या विरोधात निर्णय़ दिला. या निर्णयाविरुध्द देशमुख यांनी अौरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यांना २४ सप्टेंबर पर्यंत स्थगिती मिळाली होती. ती २८ सप्टेंबरला उठवण्यात आली. खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ५ अॅाक्टोंबर पर्यंत मुदत दिली आहे.
कॅव्हेट दाखल केला
पिंपळनेरचे सरपंच साहेबराव आनंदा देशमुख यांच्याविरुध्द जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर जातपडताळणीचा अहवाल त्यांच्या विरोधात आला. त्यांनी या निर्णयाविरुध्द अौरंगाबाद खंडपीठात स्थगिती मिळवली. येेथील स्थगिती सुध्दा उठवण्यात आली. त्यानंतर ५ अॅाक्टोंबर पर्यंत त्यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मुदत देण्यात आली आहे. मी सुद्धा येथे कॅव्हेट दाखल केला आहे.
प्रकाश सोनु पाटील, माजी पंचायत समिती सदस्य