पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक वर्ष २०२१-२२ वर्षातील पहिला कांदा लिलावाचा शुभारंभ आमदार दिलीप बनकर यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. पिंपळगाव बाजार समितीत १०४० ट्रॅक्टर व ७०४ पिकअप अशी एकूण १७४४ वाहनांमधून साधारणपणे ३६५६० क्विंटल लाल व गावठी कांदा आवक झाली. यात लाल कांदा ७१० ट्रॅक्टर व ५५४ पिकअप असे एकूण १२६४ वाहने, भाव कमीत कमी ७००, जास्तीत जास्त १००२, सरासरी ८५१ प्रति क्विंटल भाव मिळाला. तर गावठी कांदा ३३० ट्रॅक्टर, १५० पिकअप असे एकूण ४८० वाहने, भाव कमीत कमी ७५१, जास्तीत जास्त १२५२, सरासरी १०५१ प्रति क्विंटल भाव मिळाला.