रावसाहेब उगले
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव ते गोंदेपर्यंत सहापदरीकरण असले तरी हा मार्ग प्रवाशांसाठी सोईचा नाही तर “खडतर” ठरत आहे. चुकीचे दिशादर्शक फलक, स्पीडब्रेकर अनेक वर्षांपासून वाहनचालकांसाठी अक्षरशः घातक ठरत आहे. याची प्रचिती गुरुवारी पुन्हा एकदा आली. त्यामुळे टोलसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
गुरूवारी पिंपळगाव बसवंत टोल नाक्यापासून जवळ असलेल्या देशमाने पेट्रोल पंपासमोरील गतिरोधकावर दोन वाहनांचा अपघात झाला. मालेगावहून नाशिकच्या दिशेने जाणारे ठाणे येथील भाजपाचे कार्याध्यक्ष आर. डी. पाटील यांच्या इनोव्हा कारने (क्रमांक – एमएच-०४-जीएल-४०५०) गतिरोधकावर ब्रेक मारला. मात्र, गतिरोधक लक्षात न आल्याने
कुटुंबियांसह नाशिकला जाणा-या मालेगाव येथील डाॅ. अभय निकम यांच्या इनोव्हा कार (क्रमांक – एमएच-४१-व्ही-२४८७) चालकाला समोरील गतिरोधक लक्षात आले नाही. त्यामुळे डाॅ. निकम यांची इनोव्हा कार थेट समोरील भाजपा पदाधिकारी आर. डी. पाटील यांच्या इनोव्हा कारला जाऊन धडकली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

टोलचा “बेजबाबदारपणा” चव्हाट्यावर
अपघातानंतर डाॅ. अभय निकम यांनी मदतीसाठी बोलावलेल्या बाळासाहेब अहिरे यांनी पिंपळगाव टोलचे व्यवस्थापक नवनाथ केदार यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे व्यवस्थापक केदार यांच्यावर अपघातग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली.
कार मालकांचा असाही मोठेपणा
खरे तर जेव्हा जेव्हा अपघात होतात, त्यावेळी वाहनचालक एकमेकांच्या आमने – सामने येतात. कधी कधी अपघात छोटा असतानाही हाणामा-य३ होत असल्याचे चित्र सर्वश्रृत आहे. मात्र, गुरूवारी किंमती वाहनांचे नुकसान होऊनही डाॅ. निकम आणि भाजपाचे पाटील यांनी एकमेकांना भावनिकतेचा आधार दिला. त्यांच्या या मोठपणाचे उपस्थित बघ्यांनीही कौतूक केले.
पाटलांचा दिलदारपणा
अपघात झाला तेव्हा ठाणे भाजपाचे कार्याध्यक्ष आर. डी. पाटील यांना पुढे जायचे होते. तर, मालेगावचे डाॅ. अभय निकम यांना पत्नी आणि मुलासह नाशिला तातडीने जायचे होते. त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. डाॅ. निकम यांनी यावेळी त्यांचे पिंपळगावचे निर्मला लॅबचे मित्र बाळासाहेब अहिरे – पाटील यांना संपर्क साधला. अहिरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठले. त्यानंतर आर. डी. पाटील यांनी डाॅक्टर दांम्पत्यास आपल्या कमी नुकसान झालेल्या इनोव्हातून नाशिकला इच्छित स्थळी पोहचवले. त्यानंतर पाटील ठाण्याकडे रवाना झाले.

….
दोन दिवसात दुरूस्ती करू
देशमाने पेट्रोल पंपासमोरील गतिरोधकावर वारंवार अपघात होत असतील तर, याठिकाणी पाहणी करू पाहणी करून सदर गतिरोधक येत्या दोन दिवसांत दुरूस्त केले जातील.
– बी. एस. साळुंखे, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
…….
महामार्ग प्राधिकरणला कळवतो
पिंपळगाव बसवंत टोल नाक्यापासून जवळच असलेल्या देशमाने पेट्रोल पंपासमोरील गतिरोधकाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणशी तत्काळ चर्चा केली जाईल.
– नवनाथ केदार, व्यवस्थापक, पिंपळगाव बसवंत टोल-वे