पिंपळगाव बसवंत – राज्यात पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. निफाड तालुक्यातील कारसूळ येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात सायकलवरुन प्रवास करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला आहे.
राज्यासह देशात कोरोनाचे गडद संकट असतांनाच सर्वसामान्य नागरिक परिस्थितीने हतबल झाले आहेत. लॉकडाऊननंतर सहा, सात महिने होऊनही अजून काहींना रोजगार मिळालेले नाही. कोरोनाच्या या महामारीमुळे अनलॉक केल्यामुळे सर्व पूर्वपदावर येत आहे. अनलॉकनंतर पेट्रोल व डिझेलचे भाव दररोज वाढतच आहे. हे भाव सर्वसामान्य जनतेला परवडत नाही. या विरोधात शिवसेना पक्षाकडून नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कारसूळचे सामाजिक कार्यकर्ते काजळे यांनी सायकला फलक लावून इंधन दरवाढीविरोधात निषेध नोंदविला आहे.
काजळे यांच्या या अनोख्या आंदोलनात संजय मिंधे, उद्धव शिंदे ,मनोज मोरे, सतिश बनकर, संतोष वराडे, सुरेश साळुंके, अशोक बनकर, अभिजित जाधव, विलास राठोड, लहु गवळी, परसराम पवार, चंद्रकांत हिरे, समविचारी ग्रुपचे वैभव केणे, लक्ष्मण वलवे, राजू परदेशी, सुरेश हेमाले, पुंडलिक विधाते आदी सहभागी झाले होते.