पिंपळगाव बसवंत – पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ ऑक्टोबर रोजी टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या शेतक-यास श्री संत सावता व्हेजिटेबल कंपनीच्या दोघांनी मारहाण झाली होती. यात शेतकरी गंभीर जखमी झाल्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी बाजार समितीला निवेदन देऊन कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानंतर सोमवारी (दि. २) आडतदाराकडून शेतक-यास माफीनामा सादर केला.
येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या सचिवांकडून कारवाईबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर बाजार समितीकडून सर्व संचालक मंडळाची तत्काळ बैठक घेऊन आडतदारावर कारवाई करु, असेही सांगितले. त्यावर सोमवारी शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेले असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केशव बोरस्ते, निवृत्ती धनवटे, सचिव यांनी मध्यस्थी करत श्री संत सावता व्हेजीटेबलचे मालक दत्तोपंत विधाते यांनी शेतकरी जितेंद्र जाधव यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव कार्यालयात माफीनामा लिहून दिल्याने शेतक-याने माघार घेतली.
यावेळी माजी सरपंच योगेश कुयटे, माजी उपसरपंच भाऊ घुमरे, माजी सरपंच अशोक घुटे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाटपाडे, दिलीप दिघे, देवेंद्र काजळे, प्रशांत धुमाळ, दीपक गवळी आदी उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच योगेश कुयटे, माजी उपसरपंच भाऊ घुमरे, माजी सरपंच अशोक घुटे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाटपाडे, दिलीप दिघे, देवेंद्र काजळे, प्रशांत धुमाळ, दीपक गवळी आदी उपस्थित होते.
..आता तक्रार नाही
सर्वांसमोर माझी माफी मागितली. यामुळे माझी श्री संत सावता व्हेजीटेबल व कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत माझी कुठल्याही प्रकारची तक्रार राहिलेली नाही.
– जितेंद्र जाधव, शेतकरी, कारसूळ
सर्वांसमोर माझी माफी मागितली. यामुळे माझी श्री संत सावता व्हेजीटेबल व कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत माझी कुठल्याही प्रकारची तक्रार राहिलेली नाही.
– जितेंद्र जाधव, शेतकरी, कारसूळ
…
पुन्हा असे होणार नाही
माझ्याकडून व माझ्या आडतमध्ये याआधी असे प्रकार झालेला नाही. त्यादिवशी अनावधानाने घडला. मी देखील एक शेतकरी आहे. यापुढे असे प्रकार होणार नाही याची काळजी घेऊ.
– दत्तोपंत विधाते, आडतदार, पिंपळगाव बसवंत

……
तक्रार निवारणासाठी सज्ज
शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज चालते. त्यामुळे असे प्रकार बाजार समितीत होणार नाही. याबाबत आम्ही नेहमी दक्ष आहे. काही तक्रार असेल तर माझ्याकडे येऊन करा.
– बाळासाहेब बाजारे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत

बाजार समिती प्रशासन तत्पर
बाजार समिती प्रशासन तत्पर
शेतकऱ्यांच्या काही अडचणी असल्यास त्यांनी प्रशासकीय कार्यालयात येऊन सांगणे किंवा यासाठी बाजार समितीकडून तक्रार समिती स्थापन केली आहे. त्यांना सांगा. जेणे करुन आडतदार, व्यापारी व शेतकरी यांच्यात वाद होणार नाही.
– निवृत्ती धनवटे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती
– निवृत्ती धनवटे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती