पिंपळगाव बसवंत: महाराष्ट्रातील नामांकित शहर म्हणून पिंपळगाव बसवंत शहराची ओळख आहे. पण गावाला शोभेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नसल्याने प्रशासनाने याबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निफाड विधानसभा अध्यक्ष शिवमूर्ती खडके यांनी पिंपळगाव ग्रामपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन ते तीन पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पॅनल प्रमुख उमेदवारांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते.परंतु, आजपर्यंत पुतळ्याबाबत कुठलाही ठोस निर्णय किंवा हालचाल झालेली दिसत नाही. जिल्ह्यातील महत्वाची व्यापारी बाजारपेठ म्हणून शहराची ओळख असल्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजनाचा अश्वरूढ पुतळा तातडीने उभारावा.
हे निवेदन देतांना मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश गोसावी, मनवीसे विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे, रवींद्र बदादे, विजय चव्हाण, दीपक कुऱ्हाडे, सोनू बागुल, दत्तू पवार, विजय शिंदे, कैलास लकडे, भाऊसाहेब बागुल, राजेंद्र नीलकंठ,मच्छिद्र शेवरे, किरण चव्हाण, लखन चव्हाण, नाना बैरागी, आदिंसह शिवप्रेमी, मनसे पदाधिकारी उपस्थित होते.